esakal | नांदेड विभाग : गाळपासाठी २६ कारखान्यांचे ऑनलाइन अर्ज, १७ खासगी तर नऊ सहकारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे. विभागातून गाळप हंगाम २०२०- २१ साठी चार जिल्ह्यातून २६ ऑनलाइन अर्ज आले आहेत.

नांदेड विभाग : गाळपासाठी २६ कारखान्यांचे ऑनलाइन अर्ज, १७ खासगी तर नऊ सहकारी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात गाळप हंगाम २०२०-२१ करिता चार जिल्ह्यातील २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती प्रादेशीक सहसंचालक (साखर) बी. एल. वांगे यांनी दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे. विभागातून गाळप हंगाम २०२०- २१ साठी चार जिल्ह्यातून २६ ऑनलाइन अर्ज आले आहेत. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर राज्याचे साखर आयुक्त अर्जाची पडताळणी करुन आगामी गाळप हंगामासाठी परवानगी देतात. अर्ज दाखल केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातून एक सहकारी तर पाच खासगी कारखान्याचा समावेश आहे. तर हिंगोली जिल्ह्यातून चार सहकारी व एक खासगी, परभणी पाच खासगी आणि लातूर जिल्ह्यातून चार सहकारी व पाच खासगी अशा नऊ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज सादर केला आहे.

हेही वाचानांदेड : १५ आरोपींना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त- निलेश सांगडे -

मागीलवर्षी झाले होते २८ लाख टन गाळप

नांदेड विभागात गाळप हंगाम २०१९- २०२० मध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांत ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गाळप सुरू झाले. विभागात पाच सहकारी, तर १२ खासगी अशा १७ कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी पाच सहकारी व आठ खासगी, अशा एकूण १३ कारखान्यांनी गाळप सुरू केले. गाळप केलेल्या १३ साखर कारखान्यांनी २८ लाख ८७ हजार ३५० टन उसाचे गाळप केले. तर ३१ लाख २३ हजार ३७ क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती प्रादेशीक सहसंचालक (साखर) बी. एल. वांगे यांनी दिली.

गाळपासाठी ऑनलाइन अर्ज केलेले कारखाने

नांदेड - भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, देगाव (सहकारी), एमव्हीके ॲग्रो फुड लि. वाघलवाड, सुभाष शुगर लिमिटेड, हडसणी, कुंटूरकर शुगर्स लिमीटेड, कुंटूर, शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर लि. मुखेड व व्यंकटेश्वरा शुगर लि. शिवणी (सर्व खासगी).
हिंगोली- भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. बाराशिव, टोकाइ सहकारी साखर कारखाना, कुंरुदा (सर्व सहकारी), शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी (खासगी).
परभणी- गंगाखेड शुगर एनर्जी लि. माखणी, बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वारी शुगर लि. लिंबा, रेणुका शुगर लि. पाथरी, त्रिधारा शुगर लि. अमडापूर. (सर्व खासगी)
लातूर- विकास सहकारी साखर कारखाना लि. लातूर, विकास सहकारी साखर कारखाना तोंडार, मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीपनगर (सर्व सहकारी), जागृती शुगर ॲन्ड अलाइड लि. तळेगाव, सिद्धी शुगर ॲन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. उजना, श्री साइबाबा शुगर लि. शिवणी, पन्नगेश्वर शुगर लि. पानगाव व व्टेंटीवन शुगर्स लि. मळवटी लातूर.

येथे क्लिक करा - गुड न्यूज : हिंगोलीतील तीन कोरोना योध्यांचा होणार राज्यपालांच्या हस्ते गौरव

चार जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज 

नांदेड विभागातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी चार जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज आले आहेत. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश आहे.
- बी. एल. वांगे, प्रादेशीक सहसंचालक (साखर), नांदेड विभाग.