Nanded: दिवाळीत सोने, वाहन खरेदीला नागरीकांची सर्वाधिक पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दागिने खरेदी
दिवाळीत सोने, वाहन खरेदीला नागरीकांची सर्वाधिक पसंती

नांदेड : दिवाळीत सोने, वाहन खरेदीला नागरीकांची सर्वाधिक पसंती

नांदेड : मागील वर्षी दसरा - दिपावलीच्या मुहूर्तावर लहान मोठे दुकानदार, व्यवसायीक व व्यापाऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे दुकानाची सजावट करुन ग्राहकांची प्रतिक्षा केली. परंतु कोरोनाच्या भितीने नागरीकांनी बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी आरोग्य जपण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले. त्यामुळे दुकानदार, व्यापारी यांची निराशा झाली होती. यंदा कोरोनाच्या भितीला दूर सारत नागरीकांनी सोने, वाहन खरेदी सह इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरासाठी लागणाऱ्या फर्निचर वस्तूंची मनसोक्त खरेदी केली. यातून कोट्यावधींची उलाढाला झाली आहे.

दसरा आणि दिवाळीच्या खरेदी संदर्भात शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ उद्योजक - व्यापारी यांच्याशी संवाद साधला असता दिवाळीत यंदा दुचाकी वाहनांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली. तर चार चाकी वाहनात नव्या फिचरमध्ये अगदी कमी सामान्य व्यक्तीला परवडतील अशा किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. दुसरीकडे सोने चांदीच्या दरामध्ये देखील धनत्रयोदशिच्या मुहूर्तावर दर कमी झाल्याने सामान्यातील सामान्य नागरीकांनी दिवाळीच्या सनाला टिव्ही, मोबीईल, फ्रिज या ईलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सोफा, कपाट व घरासाठी लागणाऱ्या फर्निचरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

हेही वाचा: थँक्स कॅप्टन कोहली आणि कोच शास्त्री, टीम इंडियाने दिला विजयी निरोप

त्यामुळे दसऱ्यापेक्षा दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वच उद्योग - व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त कोट्यावधीची उलाढाल झाल्याचे बघायला मिळाल्याचे अनेक जाणकारांनी माहिती दिली. दिवाळी उत्सव दोन दिवसावर असेपर्यंत अनेक उद्योजक- व्यापारी यांना ग्राहक प्रतिसाद देतील की, नाही या बद्दल शंका वाटत होती. मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे लहान मोठ्या दुकानावर देखील पाय ठेवण्यास जागा शिल्लक नव्हती, मागील वर्षी कोरोनाला भिऊन घरात बसणारे नागरीक लहान मोठ्यांशी खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. नागरीकांनी दोन्ही वर्षाची दिवाळी यंदा एकाच दिवशी साजरी केली, तर उद्योजक, व्यवसायांकांची देखील दिवाळी आनंदात साजरी झाली.

ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी ः मातीपासून तयार केलेल्या पणत्या, आकाश कंदील, फटाक्यांची दुकाने, कपडा मार्केट, मोबाईल शॉपी, किराणा दुकाने, खातेवही खरेदी, रांगोळी दुकानांवर देखील ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मागील वर्षी कोरोनामुळे कुणालाही मनासारखा दसरा - दिवाळी उत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा नागरीकांनी सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू , वाहने खरेदी करुन दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली. नागरीकांच्या वर्दळीने बाजारात खरेदीसाठीचा उत्साह दिसून आला. त्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायीक, व्यापारी वर्गात देखील आनंदाचे वातावरण होते.

- बालाजी मामिडवार, व्यावसायीक.

Web Title: Nanded Diwali Festival Gold And Vehicle Purchase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top