esakal | नांदेड : शिराढोणच्या इतिहासातील ज्ञानाची दिवाळी- डॉ. गोविंद नांदेडे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिराढोण गावातील पाचशे कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सेवा संघाने एक दृढ निर्धार केला आहे. गावातील प्रत्येक घरी एकतरी अधिकारी या संकल्पाला मूर्त स्वरुप देण्यासाठी कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, भारतीय सीमेवर लढणारे सैनिक यांनी रुपये पाच लक्ष संकलीत केले.

नांदेड : शिराढोणच्या इतिहासातील ज्ञानाची दिवाळी- डॉ. गोविंद नांदेडे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दीपोत्सव अर्थात दीपावली साजरी करत शिराढोण (ता. कंधार) या गावात ज्ञानाची दीपावली साजरी केली. शिराढोणात ना पर्यावरण बिघडवणारे  फटाके फोडले गेले , ना आरोग्य बिघडवून टाकणारे तळीव- वळीव पदार्थ लोकांनी खाल्ले. इथे संपन्न झाला ग्रंथार्जनाचा संपन्न सोहळा. शिराढोण गावातील पाचशे कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सेवा संघाने एक दृढ निर्धार केला आहे. गावातील प्रत्येक घरी एकतरी अधिकारी या संकल्पाला मूर्त स्वरुप देण्यासाठी कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, भारतीय सीमेवर लढणारे सैनिक यांनी रुपये पाच लक्ष संकलीत केले.

ग्रामीण खेड्यापाड्याचे, वाडी तांड्यांचे भवितव्य उज्ज्वल करायचे असेल तर गावातील तरुणाईने आता स्पर्धा परीक्षेची तयारी करुन आपले उज्ज्वल भवितव्य घडवायचे. ग्राम उद्धाराच्या याच सिद्धांतानुसार गावातील कर्मचारी, प्राध्यापक, राष्ट्रभक्त सैनिक आणि अधिकाऱ्यांनी देशातील हा आगळा वेगळा उपक्रम कार्यान्वित केला. कर्मचाऱ्यांनी गेले महिनाभर याच प्रयोजनासाठी निर्माण केलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर स्पर्धा परीक्षा ग्रंथांसाठी पाच लाख रुपये संकलनाचा निर्धार पूर्ण केला.ॉ

हेही वाचा  नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघातच रस्त्याची दुरावस्था

वसीमा शेख यांच्या हस्ते ऐन दीपावलीच्या दिवशी हा स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लोकार्पण

युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक ग्रंथांच्या याद्या तयार झाल्या. ग्रंथ ही आले आणि या ग्रंथालयाच्या लोकार्पणाचा सोहळा ही संपन्न झाला. या ग्रंथ लोकार्पण सोहळ्याच्या ग्रंथ पीठावर ज्ञानाचे दैवत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ज्ञानज्योतीने प्रकाशमान करण्यात आली होती. या ग्रंथालयाच्या लोकार्पणसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा परीक्षेत मुलींमध्ये मेरिटने यशस्वी झालेल्या जोशी सांगवी या छोट्या खेड्यातील प्रतिकूल परिस्थितीशी चिवट झुंज देत आणि दारिद्र्याशी टक्कर देत अविरत अध्ययन करुन उपजिल्हाधिकारी झालेल्या वसीमा शेख यांच्या हस्ते ऐन दीपावलीच्या दिवशी हा स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

ग्रंथालयासाठी शिराढोण ग्राम पंचायतीने सुंदर वास्तू प्रदान

अशा प्रकारच्या विलक्षण प्रेरणादायी ग्रंथालयासाठी शिराढोण ग्राम पंचायतीने सुंदर वास्तू प्रदान केली आहे. महाराष्ट्रातील या आगळ्या वेगळ्या आदर्श ग्रंथालयाची कायम स्वरुपी वास्तू व्हावी यासाठी आपल्या स्वतः च्या मालकीची दोन गुंठे जमीन देण्याचा संकल्प गावचे नवतरुण शास्त्रज्ञ अभियंता व्यंकटेश शंकरराव शिंदे यांनी केला आहे. या ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यासाठी तहसीलदार मनीषा कदम, तहसीलदार अक्षय सुक्रे आणि सचिन कपाळे यांच्या उपस्थितीत हा ज्ञानाचा महोत्सव संपन्न झाला.

येथे क्लिक करानांदेड : सरपंच पदाचे आरक्षण आज, जिल्ह्यातील सर्वच १३०९ ग्रामपंचायतींचा समावेश

हा एकमेव सोहळा शिराढोण या ज्ञानाच्या पवित्र भूमीवर संपन्न झाला

शिराढोच्या इतिहासातील हा ऐतिहासिक सोहळा ज्यांनी अनुभवला त्यांनीन आश्चर्य व्यक्त केले. गावातील स्पर्धा परीक्षा उत्सुक युवक या सोहळ्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतभूमीवर असा हा एकमेव सोहळा शिराढोण या ज्ञानाच्या पवित्र भूमीवर संपन्न झाला. घराघरात अधिकारी घडवण्याचा दृढ निर्धार केलेल्या या गावाच्या मातीला  ज्ञानाचा  सलाम...! केवळ ग्रंथालय निर्माण करुन हा सेवा संघ थांबणार नाही. आता प्रत्येक दोन महिन्याच्या एक तारखेस एका यशस्वी, उत्साही, जिद्दी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष लाभार्थी युवकांची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा उत्सुक युवकांना पूर्णतः मोफत

स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आणि ग्रंथालय गावातील तरुणांसह पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा उत्सुक युवकांना पूर्णतः मोफत स्वरुपात असेल. कर्मचारी सेवा संघ शिराढोण या आगळ्या वेगळ्या संघटनेचे आणि त्यातील सदस्यांचे कौतुक करायला शब्द सापडत नाहीत. या कर्मचाऱ्यांच्या मातृभूमी, जन्मभूमी आणि राष्ट्रासाठी करत असलेल्या या निस्वार्थ, निर्मोही, निष्कलंक कार्याला इतिहासात तोड नाही हे निर्विवाद सत्य आहे. भविष्यात गावातील प्रत्येक कुटुंबातून अधिकारी निर्माणाच्या या शिराढोण कर्मचारी सेवासंघाच्या संकल्प यशस्वी झाले. असे मत डॉ. गोविंद नांदेडेयांनी व्यक्त केले