esakal | नांदेड - गर्दभ चिकित्‍सालयाला सगरोळीत सुरवात 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नांदेडच्या जिल्हा परिषदेला वर्षा ठाकुर यांच्या रुपाने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. तेव्हापासून सीईओ श्रीमती ठाकुर यांनी शहरासह ग्रामिण भागातील आरोग्य, पाणी आणि गाव खेड्याच्या विकासासोबतच मुक्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर दिला आहे. एका पाठोपाठ एक असे कामे सुरु आहेत. त्यांच्या कामाचा धडाका बघुन जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी ग्रामिण भागातील आरोग्य कर्मचारी जोमाने कामाला लागले आहेत.

नांदेड - गर्दभ चिकित्‍सालयाला सगरोळीत सुरवात 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - बिलोली तालुक्‍यातील सगरोळी येथील धर्मा डॉंकी सॅंक्‍चुअरी ही संस्‍था वीस वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत चालविण्‍यात येणाऱ्या गर्दभ चिकित्‍सालयाचा जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते प्रारंभ करण्‍यात आला. संस्‍थेचे विश्‍वस्‍त रोहित देशमुख, प्रमोद देशमुख, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. शंकर उदगीरे, डॉ. एस.बी. रामोड, पर्यवेक्षक दीपक जाधव, व्‍यंकट शिंदे, प्रविण पोपुलवार आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बिलोली तालुक्‍यातील सगरोळी, आरळी, देगलुर तालुक्‍यातील तमलूर, नायगाव तालुक्‍यातील बरबडा, मुखेड तालुक्‍यातील मुगाव आदी गावातील दोनशे वीस गर्दभांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण व उपचार करण्‍यात आले. धर्मा डॉंकी सॅंक्‍चुअरी या संस्‍थेतर्फे परिसरातील गाढवांच्‍या आरोग्‍याचीही काळजी घेतली जाते. शेतीची साधने, माल व बांधकामाच्‍या साहित्‍य वाहतूकीसाठी गर्दभांचा आजही मोठया प्रमाणात वापर केला जातो. 

हेही वाचा- कुष्णूर धान्य घोटाळा प्रकरण : कपील पोकर्णासह तिघांची कारागृहात रवानगी ​

घनकचरा व्‍यवस्‍थापन ज्‍वलनगृहाचे उद्घाटन
 
सगरोळी येथील संस्‍कृती संवर्धन मंडळाच्‍यावतीने घनकचरा व्‍यवस्‍थापनासाठी बांधण्‍यात आलेल्या ज्‍वलनगृहाचे उद्घाटनही मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या ज्‍वलनगृहाव्‍दारे परिसरातील केरकचरा, प्‍लास्‍टीक, कापड, पॅकींग मटेरीयल, कार्डबोर्ड, कागद, टाकाऊ वनस्‍पती, नारळाची साल इत्‍यादी पर्यावरणाला हानिकारक असलेला कचरा एकत्र करुन ज्‍वलनगृहाव्‍दारे त्‍याची विल्‍हेवाट लावली जाणार आहे.

हेही वाचा- चांगली बातमी : लोहा येथील बालिकेचा बालविवाह रोखला- जिल्हा बाल संरक्षण कक्षाची तत्परता ​

कृषि विज्ञान केंद्राला भेट 

या ज्‍वलनगृहाव्‍दारे १०० लीटर गरम पाण्‍याची सोय विद्यार्थ्‍यांना उपलब्‍ध होणार आहे. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन त्‍याची पाहणी केली. 

loading image