esakal | Nanded: निवडणूक प्रशिक्षणास २२१ कर्मचाऱ्यांची दांडी
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक

देगलूर : निवडणूक प्रशिक्षणास २२१ कर्मचाऱ्यांची दांडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर : विधानसभेच्या देगलूर पोटनिवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मंगळवारी (ता. १२) दोन सत्रात घेण्यात आले. या प्रशिक्षणाला एकूण दोन हजार ४७२ कर्मचाऱ्यांपैकी २२१ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून सक्षम कारण नसल्यास संबंधितावर कडक कार्यवाही करण्याचे संकेत निवडणूक विभागाने दिले आहेत.

प्रशिक्षणाला निवडणुक निरीक्षक पंकज शुक्ला, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत शेळके, अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोटनिवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदान निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण दोन हजार ४७२ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले होते.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

मात्र, त्यातील २२१ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून दिली असून सदरील दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

loading image
go to top