Nanded : कापूस उत्पन्नवाढीसाठी कीड नियंत्रण आवश्यक

डॉ. देविकांत देशमुख यांचे मार्गदर्शन
Nanded Cotton Crop Damage
Nanded Cotton Crop Damage

तामसा : शेतकऱ्यांनी कापसावरील पांढरी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कीड नियंत्रण केल्यास कापसाचे उत्पादन वाढेल, असा विश्वास जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख यांनी धन्याचीवाडी - जांभळा (ता. हदगाव) येथे व्यक्त केला.

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादक वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेतंर्गत आयोजित शेतकऱ्यांच्या शेतीशाळेला डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी सहाय्यक अशोक खरात, के. आर. भिसे उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून कापूस, सोयाबीन, हळद, केळी, ऊस व इतर खरीप व रब्बी पिकांबाबतचे रोग, कीड प्रादुर्भाव याबाबत कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना कराव्यात.

उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांनी गोपीनाथराव मुंडे अपघात विम्याची माहिती सांगून निकषपात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी योजनेसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. कृषी सहाय्यक के.डी. कल्याणकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी धन्याचीवाडी व जांभळा शिवारातील शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com