SIT Chief Transferred : कुबेरफलच्या उद्घाटनाला हजेरी अन् थेट गच्छंती! नांदेडमधील 'त्या' बातमीने पोलिस दलात मोठी खळबळ, आता अर्चना पाटील यांच्याकडे एसआयटीची धुरा

Nanded farmer death case latest news : नांदेडमधील शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणाच्या तपासात मोठा बदल झाला. कुबेरफल पतसंस्था उद्घाटनातील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एसआयटी प्रमुख रामेश्वर व्यंजने यांची बदली करून अर्चना पाटील यांच्याकडे तपास सोपविला.
Rameshwar Vyanjane transfer news

Rameshwar Vyanjane transfer news

esakal

Updated on: 

नांदेड : फायनान्स कार्यालयातील शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखांची अखेर बदली करण्यात आली (Rameshwar Vyanjane SIT chief transfer) आहे. कुबेरफल पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे छायाचित्र समोर आल्यानंतर तत्कालीन एसआयटी प्रमुख उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Loading content, please wait...