esakal | Nanded: जगाचा पोशिंदा झाला परदेशी; मदतीची आशा!
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

मुदखेड : जगाचा पोशिंदा झाला परदेशी; मदतीची आशा!

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड : पाऊस पडला की जगाचा पोशिंदा हा मोठा आनंदी होत असे कारण याच पावसाच्या भिस्तीवर बळीराजाने बँकेचे कर्ज, सोसायटीचे कर्ज एवढेच नव्हे तर खासगी सावकाराचे ही कर्ज काढलं होतं आणि खत व - बियाणे आनुन काळ्या मायची ओटी भरली होती. पिकं मोठी डौलदार झालेली होती. बळिराजा आता खुश होता.

आलेल्या या पिकांवर सर्वांची देनी फिटणार होती, लेकराचे शिक्षण, पोरीचं लग्न हे देखील होणार होतं पीका कडं पाहून तो मोठा आनंदित होता काय माहित नियती काय खेळ करणार? हा-हा म्हणता गाव कुसाच्या बाहेरची नदी-नाले तुडुंब भरले मोठ्या नद्यांना मिळाले. मोठ्या नद्या आपलं पात्र सोडून शेतात घुसल्या जिकडे पाहता तीकडं नद्यांच्या पाण्याने पिकांना जमिनी सकट खरडून घेऊन गेलं.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मागील महिनाभरापासून पावसाने थैमान घातल्यामुळे मुदखेड तालुक्यातील सर्वच भागात मोठा पाऊस झाल्याने शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकात पाणी साचले. नदी-नाल्या काठच्या जमिनी पाण्याने खरडून वाहून गेल्या. पावसाच्या कोपामुळे केळी, उस, पपई, मोसंबी काकडा, मोगरा, गुलाब, जरबेरा, निशिगंध, शेवंती, गलांडा या पिकांवरती रोग आला व शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती विरजण पडले. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन कापणी करून ढग मांडून ठेवले होते. पावसाने तेही ढग वाहून नेले. आता या भागातील शेतकरी मोठा हवालदिल झालेला दिसत आहे.

मुदखेड तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक स्तर वाढवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने आंध्रप्रदेश व तेलंगणा व पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याची आज काळाची गरज आहे.

- संदीप पाटील गाढे, पांगरगाव

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

मुदखेड-भोकर-अर्धापूर हा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातील बळीराजासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी लाभदायक ठरणारी एखादी योजना राबवावी व शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करावी.

- सुरेश शेटे, मुदखेड

loading image
go to top