

Nanded Farmers
esakal
नांदेड : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस यासह खरीप पिके हातची गेलीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुयनी (ता. नांदेड) येथील पाहणी दौऱ्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कृषिमंत्र्यांच्या पाहणीसाठी सकाळी साडेआठपासून बांधावर थांबलेल्या शेतकऱ्यांना दुपारी अडीच वाजता त्यांचे दर्शन झाले. ‘महालक्ष्मीचा सण असूनही आम्ही उपाशी राहून कृषिमंत्र्यांची वाट पाहत होतो.
मात्र, आमच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी केवळ आश्वासने देण्यात आली, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेले नाही, अशा परिस्थितीत शासनाने विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘कृषिमंत्री बांधावर आले, त्यामुळे काहीतरी ठोस मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, पाहणी करून आश्वासनांची खैरात देऊन ते निघून गेले, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पीकविम्याचा हप्ता भरूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे पीकविमा योजनेत तातडीने कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसेच पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ‘ट्रिगर’ लागू करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि रब्बी हंगामासाठी खते व बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ‘दरवर्षी आश्वासने मिळतात; मात्र शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष काहीच पडत नाही.
यंदाही केवळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला’, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. काजू-बदाम खाणाऱ्यांना आमची उपासमार दिसत नाही का? महालक्ष्मीच्या सणादिवशी सकाळपासून कृषिमंत्र्यांची वाट पाहत असताना शेतकऱ्यांना वेळेवर अन्न-पाण्याचीही सोय झाली नाही. ‘आम्ही उपाशी राहून मंत्र्यांची वाट पाहत होतो आणि कृषिमंत्री काजू-बदाम खात बसले होते. आमची व्यथा त्यांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल पुयनीतील शेतकऱ्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.