UPI Transaction Charges on Payments
esakal
-कुंडलिक पाटील
कुडित्रे : केंद्र सरकारने ‘मोठे यूपीआय व्यवहार सशुल्क’ करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि मुख्यत्वे शेती क्षेत्राला आर्थिक फटका बसणार (UPI charges) आहे. दोन हजार रुपयांवरील डिजिटल व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारणीच्या नियमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ वर्षाकाठी लागणाऱ्या खत खरेदीतच तब्बल १३ लाख २० हजारांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे. या निर्णयामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून, ग्रामीण भागातील ऑनलाईन व्यवहारांना ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. राज्याचा विचार करता कोट्यवधीचा कर ऑनलाईनमधून शेतकऱ्यांचा कापला जाणार आहे.