Sanjay Rathod
esakal
हदगाव : ‘आमचं सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेलं, शेती पूर्णतः पिकासह खरडून गेली. तोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत या पावसानं हिसकावला. काय सांगावं साहेब, जेवणसुद्धा आता गोड लागत नाही हो...असा आर्त टाहो एका शेतकऱ्याने रुई (धानोरा) येथे गुरुवारी (ता.२५) नुकसान पाहणीच्या दौऱ्यावर आलेल्या मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासमोर फोडला.