नांदेड वनविभाग : निबंध, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांची जंगलस्वारी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 10 October 2020

या स्पर्धेला शहरी भागासह ग्रामिण भागातून स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. लवकरच विजयी स्पर्धकांना पारितोषक रोख बक्षिस देण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक राजेश्‍वर सातेलीकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांनी सांगितले आहे. 

नांदेड : वनविभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जंगल व वन्य प्राण्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा मुळ उद्देश समोर ठेवून ता. एक ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह आयोजीत करण्यात आला होता. यानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा तसेच खुल्या गटाकरिता वन्यजीव छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला शहरी भागासह ग्रामिण भागातून स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. लवकरच विजयी स्पर्धकांना पारितोषक रोख बक्षिस देण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक राजेश्‍वर सातेलीकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांनी सांगितले आहे. 

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता सदरील स्पर्धेसाठी निबंध चित्रे तसेच छायाचित्र हे वन विभागातर्फे दिलेल्या इमेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यात असलेल्या समृद्ध अशा जैवविविधता तसेच वन्य प्राणी यांचा वावर याला अनुसरून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदरील स्पर्धेला शहरी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात ईमेल प्राप्त झाले होते. या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचापांगरा शिंदे येथील जमीनीतील गुढ आवाजाची मालिका सुरूच, आज भल्या पहाटेच आला गुढ आवाज

निबंध स्पर्धा ( पहिली ते पाचवीसाठी)

अनुष्का अमोल कदम हदगाव, सानवी चंद्रशेखर जाधव नांदेड, समीक्षा तुकाराम जोशी नांदेड, मनोज मधुकर राठोड सिंधी, मयुरी मनोहर भोसले नवीन कौठा, नांदेड, शितल वैजनाथ स्वामी नांदेड, तेजस्विनी दौलतराव अडकिने इस्लापुर हे स्पर्धक विजयी ठरले.

चित्रकला स्पर्धेत (पहिली ते पाचवी)

अर्णव मोहन पांचाळ मालेगाव, व्यंकटेश देशमुख नांदेड, विष्णुप्रिया पांडुरंग उपासे नांदेड यांचे चित्र सरस ठरले. 

येथे क्लिक करा - नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत

सहावी ते दहावी गटातील 

स्वराली प्रभाकर देशमुख नांदेड, मोहम्मद इसरा फातिमा मोहम्मद सलाउद्दीन नांदेड, समृद्धी रमेश धुतराज नांदेड.

छायाचित्र स्पर्धा पक्षी गटात 

श्यामसुंदर मधुकरराव टाक तर फुलपाखरू गटात हर्षद त्रिमुखे आणि वन्य प्राणी गटांमध्ये डॉ. शैलेश कुलकर्णी यांचे छायाचित्र उत्कृष्ट छायाचित्र म्हणून निवडण्यात आले. त्यांना ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ नांदेड- २०२०’ असे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. तर डॉ. श्रीधर अलुरकर, डॉ. अनिल साखरे, डॉ. जाधव यांच्या छायाचित्रांना विशेष छायाचित्र असे प्रमाणपत्र वन विभागातर्फे देण्यात आले आहे.

हे उघडून तर पहाकोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना

यांनी घेतले परिश्रम

सदरील स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक राजेश्‍वर सातेलीकर यांनी अभिनंदन केले आहे. सर्व स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम व प्रमाणपत्र लवकरच विजेत्यांना टपालाद्वारे पाठवली जाणार आहे. ही स्पर्धा नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, परिविक्षाधीन अधिकारी मधुमिता एस. (भावसे), सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार, श्री गायकवाड, शेख, वनपरिक्षेत्राधिकारी श्रीधर कवळे, प्रकाश शिंदे, शरयू रुद्रवार, मानद वन्यजीव रक्षक सतेंद्र कट्टी इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Forest Department: Jungle riding of contestants through essay, painting competition nanded news