नांदेड - दिवाळीनंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होतांना दिसून येते. शुक्रवारी (ता.चार) प्राप्त अहवालानुसार ४२ रुग्ण कोरोनामुक्त, २६ जणांचे अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हाभरात सध्या ३३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

गुरुवारी (ता.तीन) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी एक हजार ५४ स्वॅब अहवालापैकी एक हजार १० निगेटिव्ह, २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ५१६ वर पोहचली आहे. गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी शुक्रवारी दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५५० वर स्थिर आहे.
हेही वाचा- दुर्दैवी घटना : लग्नाच्या चिंतेने तरुणीने घेतला गळफास
जिल्हाभरात ३३६ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार
तर नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - १०, मुखेड - १३, हदगाव - एक, भोकर- एक, नायगाव - एक असे २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २० हजार ५१६ वर पोहचली आहे. त्यापैकी १९ हजार ४३६ रुग्ण कोरोनामुक्त आणि ५५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हाभरात ३३६ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, यापैकी १५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
हेही वाचा- नांदेड : रक्तपेढ्यांच्या गोरखधंद्यावर अंकुश बसणार, नियम डावलल्यास होणार कारवाई
नांदेड जिल्हा कोरोना मीटर ः
शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण - २६
शुक्रवारी कोरोनामुक्त रुग्ण -४२
शुक्रवारी मृत्यू - शून्य
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २० हजार ५१६
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - १९ हजार ४३६
एकूण मृत्यू - ५५०
गंभीर रुग्ण - १५
उपचार सुरू - ३३६
स्वॅब अहवाल येणे बाकी - ६२३