नांदेड : पैशाच्या कारणावरून मित्राचा चाकुने भोसकुन खून, पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Sunday, 27 September 2020

ही घटना मालटेकडी परिसरात शनिवारी (ता. २६) रात्री घडली. या प्रकरणी दोघांना नांदेड ग्रामिण पोलिसांनी अटक करुन त्यांना रविवारी (ता. २७) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : पैशाच्या देवाण घेवाणीवरून धाब्यावर काम करणाऱ्या दोन वेटरमध्ये झालेल्या हाणामारीत एकाने आपल्याच एका सहकाऱ्याचा चाकुने सपासप वार करुन निर्घृण खून केला. ही घटना मालटेकडी परिसरात शनिवारी (ता. २६) रात्री घडली. या प्रकरणी दोघांना नांदेड ग्रामिण पोलिसांनी अटक करुन त्यांना रविवारी (ता. २७) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

गुरुद्वारा परिसरातील रहिवासी असलेला साईनाथ किशन गुडमलवार (वय २६) व मारेकरी शेख अजीम हे दोघे मालटेकडी परिसरातील सिटी धाबा येथे वेटर म्हणून काम करत होते. या दोघांची मैत्री असताना देवाण-घेवाणाचा व्यवहार झाला होता. पैशाच्या देवाण- घेवाणीकरून शुक्रवारी (ता. २६) रात्री साईनाथ गुडमलवारसोबत अजीम व त्याचा साथीदार शेख साजिद अहमद खाजा या दोघांनी वाद घातला. शाब्दीक बाचाबाचीनंतर भाडणे थेट हाणामारीत झाले. यावेळी साईनाथच्या छातीवर व मांडीवर चाकूने सपासप वार केल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा रात्रीच मृत्यू झाला.

हेही वाचास्वारातीम विद्यापीठातील कामकाज ठप्प, राज्यव्यापी आंदोलनास वाढता पाठिंबा

मारेकऱ्यांना ता. २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

या घटनेची माहिती नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीसांनी शेख अजीम शेख महेबुब शेख साजिद यांना ताब्यात घेतले. नागेश किशन गुडमलवार याच्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या दोघांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ता. २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात करत आहेत.

येथे क्लिक कराविष्णुपूरी धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सौर दिव्याची चोरी एकाविरुद्ध गुन्हा

मुखेड तालुक्यातील सकनुर येथील ग्रामपंचायतीने बसविलेल्या सौर दिव्याची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी एका विरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ता. २३ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच- तीनच्या सुमारास पंप ऑपरेटर बापूराव लामतुरे पाणी सोडण्यासाठी जात असताना नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेजवळ ग्रामपंचायतकडून लावण्यात आलेले सौर पॅनल बॅटरी चोरी करताना एकजण दिसून आला. साडेपाच हजार रुपये किंमत असलेल्या सौर पॅनल बॅटरीच्या चोरीप्रकरणी श्री. निळकंठ यांच्याविरुद्ध बुधवारी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री आलुरे तपास करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A friend was stabbed to death for money nanded news