Sonu Kalyankar Murder Shocks City
esakal
नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात सोमवारी (ता.६) पहाटे घडलेल्या एका निर्घृण हत्येने नांदेड पुन्हा एकदा हादरले आहे. शिवसेना युवा सेनेचे शहराध्यक्ष असलेले सोनू कल्याणकर यांची भर रस्त्यात शस्त्रांनी सपासप वार करत हत्या करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत शहरात सलग पाच खून झाल्याने गँगवॉरचे सावट अधिक गडद झाले असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.