नांदेड : ग्राम पंचायत निवडणूक, विविध प्रमाणपत्रांसह कर भरण्यासाठी इच्छूकांची धावपळ

file photo
file photo

फुलवळ (जिल्हा नांदेड) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची सुरुवात बुधवार (ता. २३) पासून झाली आहे. निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रांची जुळवा- जुळव करण्यासाठी इच्छूकांची धावपळ तर सुरुच झाली पण या निमित्ताने ग्रामपंचायतला नळपट्टी व घरपट्टी मिळत आहे. कोरोनामुळे खडखडाट असलेल्या ग्रामपंचायतच्या तिजोरीत पैशाचा भरणा होत आहे. 

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने सरपंच पदाचे काढलेले आरक्षण रद्द केले. त्यामुळे भावी सरपंचाच भ्रमनिरास झाला असल्याने निवडणुकीतील चुरस काही प्रमाणात कमी झाली असली तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले कामाला लागले आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी विविध प्रमाणपत्रासह ग्रामपंचायतची बेबाकी, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर वगळता इतर कराबाबत थकबाकी नसल्याचा व ग्रामपंचायतचा ठेकेदार नसल्याचा स्वंयघोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभुमी नसल्याचे प्रमाणपत्र, खर्चाचे हमीपत्र, १२ सप्टेंबर २००१ नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र यासह अन्य प्रमाणपत्राची गरज असल्याने राखीव प्रभागासह सर्वसाधारण गटातूनही निवडणूक लढवण्याची तयारी करत असणाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे.

निवडणूक लढवणाऱ्यासाठी ग्रामपंचायतच्या अनेक प्रमाणपत्राची गरज असून  या निमित्ताने ग्रामसेवकांशी संपर्क करुन कागदपत्रे काढून घेतले जात आहेत. गेल्या आठ नऊ महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असल्याने विविध कर भरण्याकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. आता मात्र लाँकडाऊन शिथिल झाला व व्यवहारही सुरळीत होत असल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा हंगाम सुरु झाला. त्यामुळे गावातील पुढारी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी ग्रामपंचायतमध्ये येवून नळपट्टी व घरपट्टी किती आहे याची विचारणा करण्याबरोबरच रक्कम भरुन बेबाकी प्रमाणपत्र घेत आहेत.

गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून ता. २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. कधी नव्हे ते यंदा गावचे कारभारी होण्यासाठी तरुण मंडळी इच्छूक असल्याने निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उमेदवारी दाखल करतांना निवडणूक लढवणाऱ्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे त्यामुळे कर भरुन कागदत्रांची जुळवाजुळव करण्याची खबरदारी घेतल्या जात आहे. एरवी सरपंच, ग्रामसेवक घरपट्टी व नळपट्टी भरण्यासाठी तगादा लावत असतांना कुणीच प्रतिसाद देत नाहीत पण निवडणुकीच्या निमित्ताने अनेकजण स्वतः होवून ग्रामपंचायतमध्ये येत असल्याने ग्रामपंचायतच्या तिजोऱ्या खुलणार आहेत. गावागातील इच्छुक कर भरण्यासाठी थेट ग्रामपंचायतमध्ये येत असल्याने कोरोना काळात अर्थिक अडचणीत आलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक मद्दतीचा हात मिळणार आहे . 

ता. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन दाखल करणा येणार आहे तर ता. ३१ डिसेंबर रोजी छाणणी होणार असून ता. ४ जानेवारी २०२१ रोजी तीन वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेता येणार आहे. ता. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजताच्या नंतर चिन्ह वाटपासह उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. ता. १५ जानेवारीला मतदान तर ता. १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आसल्याची माहिती.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com