
राज्यातील अनेक भागात ऑरेंज अन् यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठावाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, नांदेडमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसानं हाहाकार उडाला आहे. सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. ८० पेक्षा जास्त नागरिक अडकून पडले आहेत. एका रात्रीत नदीच्या पाणी पातळीत तब्बल १८ फुटांची वाढ झाल्यानं पूरस्थिती निर्माण झालीय.