नांदेड : ‘पेव्हर ब्लॉक’ मुळे जिल्हा परिषद शाळेत तलाव

तुंबलेल्या घाण पाण्यामुळे तब्बल सहाशे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
Zilla Parishad school Pever Block
Zilla Parishad school Pever Block

माहूर : तालुक्यातील दर्जेदार शिक्षणासाठी नावलौकिक वाईबाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात पंधरावा वित्त आयोग निधीतून नव्याने बांधकाम करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अंदाजपत्रकाला डावलून चुकीच्या पद्धतीने थातूरमातूर रित्या बसविण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. गुरूवारी रोजी रात्रीला आलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण शाळेचे पाणी कंपाउंड मध्ये साचल्याने शाळेला तळ्याचे स्वरूप आले आहे.

वाई बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वर्ग एक ते आठ पर्यंत तब्बल सहाशे तीस इतके विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खासगी मॉर्डन शाळेच्या तुलनेत सरस असल्याकारणाने आसपासच्या खेड्यापाड्यातील विद्यार्थी देखील येथे शिक्षण घेतात. शिक्षकांच्या मेहनतीने नावलौकिक झालेली ही शाळा गुत्तेदारीचा वारसा लाभलेल्या स्थानिक राजकारण्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारा पंधरावा वित्त आयोग आणि इतर विकास निधीमधून खोली बांधकाम, शालेय साहित्य, यंत्रसामग्री, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक आदी कामात प्रचंड भ्रष्टाचार करून थातूरमातूर व सुमार दर्जाची कामे करून बीले लाटण्या पलीकडे दुसरा कुठलाच सकारात्मक हेतू येथील मंडळीचा नाही.

काही महिन्यापूर्वीच शाळेत बांधकाम करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक कामात प्रचंड अनियमित करून चुकीच्या पद्धतीने पेव्हर आथरल्या गेल्याने रात्री पडलेल्या पावसाचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे आज जिल्हा परिषद शाळेला मच्छी तळ्याचे स्वरूप आले होते. पाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पंचायत समितीने या बाबीची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

शाळेत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहे. पण उताराचा विचार ठेकेदार व अभियंत्यानी केलेला नाही. चारही बाजूने भिंत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न काढल्याने पटांगणाच्या मधोमध पेव्हर ब्लॉकचा खड्डा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतला प्रशासक आहे व शाळेतील व्यवस्थापन समिती बरखास्त झाल्याने पालक वर्ग आमच्याकडे तक्रार करत असून शाळेतील जमा होणाऱ्या पाण्याचे प्रश्न लवकर निघाली न निघाल्यास विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा पालक देत आहेत.

- एन.बी. राठोड, मुख्याध्यापक, वाई बाजार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com