नांदेड : पळसपुर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

हिमायतनगर तालुक्यातील घटना : दगडफेकीत एक जण गंभीर जखमी
NandedHimayatnagar thieves increase
NandedHimayatnagar thieves increasesakal

हिमायतनगर : तालुक्यातील मौजे पळसपुर येथे मध्यरात्री पंधरा ते वीस जण असलेल्या चोरट्यांच्या टोळीने गावात शिरून दोन किराणा दुकान फोडून रोख रक्कम घेवून दगडफेक करत चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी च्या मध्यरात्री घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे पळसपुर येथे चोरांनी गावात शिरून मध्यरात्री ठिक १२.३० वाजता दिगांबर वानखेडे यांच्या घराच्या दरवाज्याची कडी लावून त्यांचे किराणा दुकान फोडून त्यांच्या दुकानात असलेले पन्नास हजाराची रोख रक्कम पळवली. त्यानंतर रात्री ०१.२० वाजता माधवराव सुर्यवंशी यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना चोरांनी एका मागे एक दगडफेक केली. त्या दगडफेकीत माधवराव सुर्यवंशी हडसनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यानंतर अवधुत देवसरकर यांच्या किराणा दुकानाजवळ येऊन पुन्हा दगडफेक केली. तसेच त्यांच्या किराणा दुकानातून १५ हजार रोख रखमेसह त्यांच्याकडे ग्राहकांचे शिवायला टाकलेले कपडे व विक्रीसाठी ठेवलेले २५ हजाराचे कपडे पळवले, अवधुत देवसरकर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दोन तास चोरांची टोळी गावात ठिक ठिकाणी चोरी करत फिरत होते. दरम्यान गावातील नागरीक जागे झाल्याने चोरांनी येथून पळ काढला. हा सर्व प्रकार ज्यांच्या दुकाणात चोरी झाली ते दुकानदार आपल्या डोळ्यांनी बघत होते.

परंतु चोरांच्या हातात धारधार हत्यार आणि ते सलग दगडफेक करत असल्यामुळे भिती पोटी ते काही करू शकले नाही. त्याच बरोबर गावातील अनेक नागरीकांनी चोरांना बघीतले पण चोर दगडफेक करत असल्याने कोणीही सुरूवातीला घराच्या बाहेर येणाचा प्रयत्न केला नाही. गावात रात्रभर दहशतीचे वातावरण होते.

ग्रामस्थांनी सावध राहावे

पळसपुर गावात चोरांनी चोरी करण्याच्या अगोदर दोन-तीन दिवस गावात वेगवेगळ्या वस्तू विकण्याचे नाटक करून गावाची पुर्ण माहीती घेऊनच ही चोरी केली असल्याचा अंदाज गावातील नागरिक वर्तवत आहेत. त्यामुळे गावात भंगार व तसेच इतर वस्तू विक्रीला घेऊन येणाऱ्या लोकांपासून येणाऱ्या काळात सावध राहावे. काही गैर प्रकार दिसून येत असेल तर तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन श्रीमती कोमल कागणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com