
केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याबाबत त्यात सुधारणा करणे व त्यातील जाचक अटी व शर्ती कमी करण्यासाठी नवी दिल्ली येथे सिमेवर जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, हे आंदोलन आठवडाभरापासून चालू आहे.
नांदेड - केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे जाचक कायदे तयार केले, त्या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याबाबत त्यात सुधारणा करणे व त्यातील जाचक अटी व शर्ती कमी करण्यासाठी नवी दिल्ली येथे सिमेवर जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, हे आंदोलन आठवडाभरापासून चालू आहे, परंतु आजपर्यंत केंद्र शासनाने दखल घेतली नाही. तेव्हा केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत, तेव्हा प्रधानमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना व दशमेश चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
हेही वाचा - नांदेड : जि. प. ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीस दांडी मारणार्या अधिकार्यावर कारवाई करणार -
या उपोषणामध्ये जिल्हाध्यक्ष दासराव हंबर्डे, समन्वयक रणजितसिंघ कामठेकर, राज्य सरचिटणीस गोपाळ पाटील इजळीकर, ऍड. सुभाष कल्याणकर, शंकर कंगारे, देवेंद्रसिंघ कामठेकर, हरजिंदरसिंघ कामठेकर, स. लखनसिंघ कोटतीर्थवाले, रघबिरसिंघ बुंगई, नानकसिंघ डोरलीवाले, मनबीरसिंघ ग्रंथी, बाबा तेजसिंघजी जत्थेदार मातासाहेब, हरमिंदरसिंघ कामठेकर, ईश्वर गव्हाणे, दीपक वाहूळकर, छगनसिंघ कामठेकर, आनंद गव्हाणे, सरपंच अहेमदभाई, लड्डूसिंघ कामठेकर आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.