नांदेड : घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून सव्वालाखाचा ऐवज जप्त- स्थागुशा

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 14 October 2020

त्याच्याकडून चोरीचे दहा मोबाईल, तीन दुचाकी आणि स्पोर्टसची महागडी सायकल असा अंदाजे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

नांदेड : शहर व जिल्ह्यात घरफोडी करणारा अट्टल तळणी (ता. नांदेड) येथील एका चोरट्यास बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास त्याला भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दहा मोबाईल, तीन दुचाकी आणि स्पोर्टसची महागडी सायकल असा अंदाजे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

नांदेड शहर व जिल्ह्यात घरफोडी व चोरी करुन पोलिसांना गुंगारा देणारा अट्टल चोरटा शैलेश उर्फ खन्ना नवनाथ सावंत (वय २४) रा. तळणी (ता. नांदेड) हा तळणी परिसरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनीही सुचनांची अंमलबजावणी सुरु करुन आपल्या सर्वच पथकांना कार्यरत केले. गुन्हा घडल्यानंतर काही तासाच्या आतच गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत येत आहे. ही पोलिसांची जमेची बाजू जरी असली तरी गुन्हे घडू नये यासाठी नाकाबंदी आणि सर्च आॅपरेशन मोहीम राबविणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा -  नांदेड : बळेगाव रस्त्यासाठी तळेगावकर उतरणार रस्त्यावर, काय आहे कारण? -

अट्टल चोरटा स्थागुशाच्या जाळ्यात

वरिष्ठांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रमांकात पांचाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरु केली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अट्टल घरफोडी करणारा चोरटा शैलेश सावंत हा एका ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचुन बुधवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. त्याने शहरात अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे श्री. पांचाळ यांनी सांगितले.

येथे क्लिक करा - मोठी बातमी : अतिवृष्टीचा धोका, या आठवड्यात अशी घ्या काळजी- प्रदीप कुलकर्णी -

अंदाजे सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त 

त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून १० मोबाईल, तीन दुचाकी आणि एक स्पोटर्सची महागडी सायकल असा जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रमाकांत पांचाळ यांनी त्याला भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या फिर्यादीवरुन शैलेश सांवतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Home burglary seized from burglar lcb nanded crime news