नांदेड : उन्हाच्या चटक्याने शेतीकामे खोळंबली

अनेक ठिकाणी हळद काढणीची कामे सुरु आहेत.
farmers oxen
farmers oxensakal

नांदेड : जिल्ह्यात मागील महिन्यापासून तापमानात वाढ झाल्याने शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी हळद काढणीची कामे सुरु आहेत. तापमान वाढीमुळे या कामावरही परिणाम दिसून येत आहे. उन्हाळी हंगामातील पिकांवरही उन्हाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान होते. यानंतर मार्च महिन्यात मात्र तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली. तब्बल दीड महिन्यापासून तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्यावर नोंद होत आहे. यामुळे दुपारनंतर शेतीकाम करणाऱ्यांना सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे.

जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर हळदीची लागवड मागील हंगामात झाली होती. पीक काढणीला आल्याने काही भागात हळद काढणी झाली. तर बऱ्याच ठिकाणी अद्याप हळदीची काढणी सुरु आहे. हळद काढणीनंतर त्याला शिजविण्यासह वाळविण्याची प्रक्रिया करावी लागते. दुपारी उन्हाचा चटका अधिक बसत असल्याने शेतकरी रात्रीच्या वेळेला प्रक्रिया कामांना प्राधान्य देत आहेत. उन्हाच्या प्रखरतेमुळे उन्हाळी हंगामातील ज्वारी, उन्हाळी सोयाबीन, चारा पिके यासह भाजीपाला व फळपिकांची फळगळ व फुलगळ होत असल्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी संरक्षीत पाण्याचा वापर करुन दुपारी शक्यतो काम टाळण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

सध्या उकाडा वाढला आहे. तसेच उन्हाच्या झळा सहन होत नसल्याने हळद काढणीसाठी महिला मजूर कामावर येण्यास धजावत नाहीत. परिणामी काम रखडत आहे.

- चक्रधर हंबर्डे, शेतकरी, वाका, ता. लोहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com