नांदेड - आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य ऑनलाईन परीक्षा रद्द, तर अशी होणार निवड

शिवचरण वावळे
Sunday, 6 September 2020

 जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य ऑनलाईन प्रवेश परीक्षा रेसिडेंसियल पब्लिक स्कूल येथे घेण्यात येणार होती. मात्र  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

नांदेड - एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील २०१९-२० या शैक्षणिक वर्षामधील पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कुलची प्रवेश परीक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी ही परिक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे यापुढे शासनमान्य शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी वी ते नववीतील गुण लिंकमध्ये १५ सप्टेंबर २०२० पर्यंत भरावेत. असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी केले आहे.
  
हेही वाचा- नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह ​

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ही परीक्षा ऑनलाईन होणार होती परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रात नांदेड जिल्हातील सर्व शासकीय व आनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता पाचवी ते नववी मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. या विद्यार्थ्यांच्या मागील सत्राच्या गुणांच्या आधारे आता विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. 
हेही वाचा- नांदेडमध्ये ‘सी.एच.बी.’ प्राध्यापकांनी दिल्या काळ्या शुभेच्छा

९०० गुणापैकी किती गुण यावर निवड यादी 

इयत्ता 6 व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी आता 5 व्या वर्गातील प्रथम सत्रातील गुण भरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहेत. हाच निकष इ. 7 वी ते 9 वी च्या रिक्त जागेवेरील प्रवेशाबाबत लागु करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकंदर ९०० गुणापैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांच्या गुणाच्या  ऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही. त्यामुळे अर्ज भरताना आवेदन पत्रामधे संपर्क, मोबाईल नंबर, विद्यार्थ्यांची जन्म तारीख, विद्यार्थ्यांच्या मागील इयतेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रीकेची प्रत, शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वंतत्र भरावी तसेच गुणपत्र स्वतंत्र अपलोड करावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: If the Eklavya online examination of tribal students is canceled, then the selection will be made Nanded News