नांदेड : दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंगमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

नांदेड : दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंगमध्ये वाढ

नांदेड ः त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर दगडफेकीची घटना नांदेडमध्ये शुक्रवारी (ता.१२) घडली होती. या प्रकरणात गेल्या चार - पाच दिवसांपासून शहरामध्ये आरोपींची धरपकड सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४७ जणांना अटक केली असून अजून २९ आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी मंगळवारी (ता.१६) दिली.

रझा अकादमीच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेकांनी चिथावणीखोर भाषणे केली. सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटली आहे. त्यांची शोध मोहिम सुरु आहे. यावेळी यातील काही समाज कंटकांनी शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकानांची नासधुस करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. यात अनेक जण जखमी झाले असून यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना काहीजण फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. शहरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्याअंतर्गत फिक्त पाॅईंट तसेच पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहेत. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर देखील पोलिस विभाग लक्ष ठेवून आहे. भविष्यात नांदेड शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त पोलिस अधीक्षक कबाडे यांनी दिला आहे.

loading image
go to top