होळीच्या सणाला महागाईचा रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Celebration

Holi 2023 festival :होळीच्या सणाला महागाईचा रंग

होळीच्या सणाला महागाईचा रंग

गाठ्या, पिचकारी, रंग, गुलालाच्या दरामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ

Nanded Inflation colors festival Holi

नांदेड : रंगांचा सण होळी आज (ता.सहा) आणि मंगळवारी (ता.सात) साजरा होत आहे. त्या प्रार्श्वूमीवर नांदेड शहरातील वजिराबाद, इतवारा, श्रीनगर येथील बाजारपेठेत दुकानदारांनी आपापली दुकानेसाहित्याने भरलेली आहेत.

मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रंग, पिचकारी, गालालसह होळीच्या दिवशी लागणाऱ्या गाठीच्या दरामध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने रविवारी (ता.चार) सुट्टीचा वार असतानाही खरेदीदारांचा निरुत्साह दिसून आला.

नांदेड शहरातील इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर या मुख्य बाजारातील पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकारी सजरी आहेत. याशिवाय छत्रपती चौक, महात्मा फुले मार्केट, भाग्यनगर आदी ठिकाणीही होळीच्या साहित्याने दुकाने थाटली आहेत.

यंदाच्या उत्सवात चांगला व्यवसाय होईल या आशेने छोट्या व्यावसायिकांनी होळीचे सर्व सामान दुकानात भरले. मात्र बाजारात खरेदीदारांमध्ये दिसून आला नाही.

हे आहे आकर्षण

पिचकारीची किंमत २५ ते ५५० रुपयांपर्यंत आहे. लहान मुले आणि प्रौढांसाठी पिचकारीचे विविध प्रकार उपलब्ध असून त्यात बूम, बंदुकीसारखी पिचकारी, सेंज्युरी कलर थ्रोअर, रंगांपासून बचाव करणारे मुखवटे, टीव्ही रिपोर्टर्सनी वापरलेली टोपी आदी विशेष आकर्षण बघायला मिळत आहे.

होळीचा सण म्हटले की गाठीला महत्त्व आहे. होळी पेटविण्यासाठी गाठी प्रसाद म्हणून उपयोगात येते. होळीच्या दिवशी गाठी नातेवाईक, शेजाऱ्यांना दिली जाते.

ही गाठी यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढली आहे. नांदेड शहरात इतवारा, वजिराबाद व इतर ठिकाणच्या बाजारात गाठीची दुकाने सजली आहेत. गतवर्षी ६० ते ७० रुपये किलो असलेली गाठी यावर्षी १०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.

टॅग्स :HoliNandedinflation