esakal | नांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार? दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

दरवर्षीपेक्षा यंदा नांदेड जिल्ह्यातील किमान दोन हजार विद्यार्थी एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस आणि बीएएमएस आदी अभ्यासक्रमास प्रवेश निश्‍चित होईल, असा विश्‍वास आयआयबीचे प्रा. दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

नांदेड - कोरोनाचे सावट , विद्यार्थ्यांची वर्दळ थांबणार? दोन हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्याची आशा

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मुंबई - पुण्यानंतर नांदेड शहर राज्यातील वैद्यकीय शिक्षणासाठीचे प्रथम पसंतीचे शहर म्हणून उदयास आले आहे. राजस्थानातील कोटा शहरावरही मात करत वैद्यकीय शिक्षणासाठी नांदेडात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे राज्यासह इतर राज्यातील विद्यार्थी देखील नांदेडात शिकवणीसाठी येतात. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची काहीशी वर्दळ थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. यात महाराष्ट्र खालून दुसऱ्या स्थानी फेकले गेले आहे. असे असले, तरी दरवर्षीपेक्षा यंदा नांदेड जिल्ह्यातील किमान दोन हजार विद्यार्थी एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस आणि बीएएमएस आदी अभ्यासक्रमास प्रवेश निश्‍चित होईल, असा विश्‍वास आयआयबीचे प्रा. दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा- राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार ​

विद्यार्थी - पालकांनी केली मनाची तयारी 

दरवर्षी राज्यासह इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीयपूर्व अभ्यासक्रमासाठी शहरात दाखल होतात. परंतु यंदा पहिल्यांदाच कोरोना संसर्गामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होईल, असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. असे असले तरी, अनेक खासगी शिकवणी चालकांनी आॅनलाइन शिक्षणावर अधिक भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसली तरी विश्‍वासाहर्तेमुळे त्या- त्या अभ्यासिकेत प्रवेश निश्‍चित करुन त्यांच्याकडून आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मनाची तयारी केली असुन अनेक जण वैद्यकीय शिक्षणासाठी शहरातील नामांकित खासगी शिकवणीत प्रवेश निश्चित करताना दिसत आहे. 

हेही वाचले पाहिजे- दुष्काळ मदत पाहणीला आमदाराच्या नाराजीची फोडणी ​

नियमात जुजबी बदल

नीटचा निकाल लागला असला, तरी प्रवेशासाठीच्या कुठल्याही पूर्व सुचना प्राप्त झाल्या नाहीत. येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व सुचना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आतापासूनच आॅनलाइन फार्म अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. सर्व प्रक्रिया आॅनलाइन असल्याने वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नियमात जुजबी बदल करण्यात आले आहेत. ते विद्यार्थ्यांना समजुन घ्यावेत लागणार आहेत. 

विद्यार्थी व पालकांनी अमिषाला बळी पडू नये
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेत खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना १४७ मार्क, इडब्लुएस, अपंगांसाठी १२९ व मागास प्रवर्गासाठी ११३ मार्क असल्यास त्यास वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरु शकतो. परंतु त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर राज्यात जाऊन प्रवेश मिळविल्यास त्याची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त विद्यार्थी व पालकांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये. 
- संजय सारडा, शिक्षण सल्लागार.