नांदेड : नुकसानग्रस्तांचा १३० कोटींचा विमा परतावा जमा

दोन हप्त्यात मिळाले ४६१ कोटी; सात लाख ३५ हजार ८११ लाभार्थी
File photo
File photosakal

नांदेड: मागील खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना ३३० कोटींच्या पहिला हप्त्याचे वितरण झाल्यानंतर उर्वरीत परतावा मिळाला नव्हता. राज्य शासनाने त्यांचा हप्ता विमा कंपनीकडे जमा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरीत १३० कोटी ५३ लाख रुपये जमा झाले आहेत.

खरिप हंगाम २०२१ - २०२२ मध्ये जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ९४१ अर्जदार शेतकऱ्यांनी उडीद, मुग, तूर, कापूस, ज्वारी व सोयाबीनसाठी ४४ कोटी ९५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २९४ कोटी ९२ लाख ४७ हजार ९०१ रुपयानुसार विमा कंपनीकडे ६३० कोटी ८० लाख ३४८ रुपयांचा विमा हप्ता जमा झाला होता. यातून पाच लाख १६ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र संरक्षीत करण्यात आले होते. तर विमा संरक्षीत रक्कम दोन हजार १६२ कोटी ८६ लाख निर्धारीत करण्यात आली होती.

दरम्यान, सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत सात लाख ३५ हजार ८११ अर्जदार शेतकऱ्यांना ४६१ कोटींचा पिकविमा परतावा मंजूर झाला होता. यापैकी ७३ टक्क्यानुसार ३३० कोटींचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. परंतु २७ टक्क्यानुसार ३३१ कोटींचा विमा रखडला होता. याबाबत जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाकडून विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, विमा कंपनीला शासनाकडून विमा हप्ता प्राप्त झाल्याने उर्वरित १३० कोटी ५३ लाख रुपये सात लाख ३५ हजार ८११ अर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

तालुकानिहाय वितरीत २७ टक्के विमा परतावा

  • अर्धापूर - पाच कोटी दहा लाख

  • भोकर - सात कोटी चार लाख

  • बिलोली - नऊ कोटी पन्नास लाख

  • देगलूर - दहा कोटी सत्तर लाख

  • धर्माबाद - पाच कोटी ४३ लाख

  • हदगाव - १६ कोटी ७३ लाख

  • हिमायतनगर - ४ कोटी ३० लाख

  • कंधार - बारा कोटी १३ लाख

  • किनवट - एक कोटी ७९ लाख

  • लोहा - १५ कोटी ११ लाख

  • माहूर - दोन कोटी ७६ लाख

  • मुदखेड - तीन कोटी ९८ लाख

  • मुखेड - १४ कोटी ७६ लाख

  • नायगाव - ११ कोटी ४५ लाख

  • नांदेड - पाच कोटी ४८ लाख

  • उमरी - चार कोटी २८ लाख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com