नांदेड : आयपीएस अधिकारी चांडक यांची वाळू घाटावर कारवाई

महसूल विभागाचे पितळ उघडे ः सगरोळीच्या घाटातून पाच जेसीबीसह ३८ ट्रक ताब्यात
Nanded IPS Office Archit Chandak
Nanded IPS Office Archit ChandakSakal Digital

बिलोली : मांजरा नदीपात्रातील सगरोळी वाळू घाटातून (दोन) मधून रात्रीच्यावेळी पाच जेसीबी मशिनच्या साह्याने नियमबाह्य रेती उपसा करताना बिलोलीचे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास धडाकेबाज कारवाई करून पाच जेसीबी मशीनसह ३८ रेतीने भरलेले ट्रक ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे बिलोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी व तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यासह महसूल यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान मध्यरात्रीच बहुसंख्य ट्रकचालकांनी कारवाईच्या भीतीने पलायन केले आहे.आयपीएस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या सर्व वाहनावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया बिलोली सुरू आहे.

बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांच्यासह स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी व जिल्हा कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पोलीस विभागातील काही अधिकारी-कर्मचारी आरटीओ विभागातील जबाबदार वरिष्ठ अधिकारी आदींच्या सहकार्यामुळे मागील दोन ते अडीच महिन्यापासून मांजरा नदीपात्रातील वेगवेगळ्या रेती घाटातून नियमबाह्य बेसुमार रेती तस्करी सुरू करण्यात आली आहे‌. याबाबत मांजरा बचाव कृती समितीसह बहुसंख्य समाज प्रेमी नागरिकांनी प्रशासनाच्या धोरणा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशाराही दिला होता परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आर्थिक प्रलोभनाला बळी पडून अवैध रेती तस्करीसाठी अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविल्याने रेती तस्करीला आळा घालणार तरी कोण? अशी स्थिती निर्माण झाली होती.

मात्र बिलोली येथे दीर्घ सुट्टीनंतर रुजू झालेले आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी महसूल आरटीओ व पोलिस विभागातील काही अर्थलोभी अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करत येसगी पाठोपाठ सगरोळी घाटावर धडाकेबाज कारवाई केली. त्यांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मांजरा नदी पात्रातील रेती आयपीएस अधिकारी चांडक यांची वाळू घाटावर कारवाई घाटातून अवैध मार्गाने बेसुमार रेतीची तस्करी होत असल्याच्या बातम्या सकाळमधून वारंवार प्रकाशित झाल्या. महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांचे रेती ठेकेदारांना आर्थिक तडजोडीतून पाठबळ मिळाल्याने रेती तस्करीला उत आला होता.

प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मालिन भूमिकेबद्दल सकाळ मधून ‘यूपीएससी व एमपीएससीच्या स्तंभालाच कीड लागल्याची भावना’हे वृत्त ही प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा व बिलोलीचे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी धडाकेबाज कारवाई करून आपली प्रतिमा वेगळी असल्याचे सबंध जिल्ह्यात दाखवून दिले. सगरोळी घाटात कारवाई करताना रामतीर्थ नायगाव बिलोली यासह अन्य भागातून शस्त्रधारी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

रविवारी मध्यरात्री झालेल्या कारवाईत पाच जेसीबी मशीन सह अडोतीस रेतीचे ट्रक ताब्यात घेण्यात आले आहे संबंधित वाहनांचे कागदपत्रे तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com