नांदेड : किनवट-हिमायतनगर महामार्गाचे काम रखडले

आता पावसाळा आठवड्यावर : रस्ता केव्हा बनणार, नागरिकांचा संतप्त सवाल?
Nanded Kinwat Himayatnagar highway Work stoped
Nanded Kinwat Himayatnagar highway Work stopedsakal

हिमायतनगर : हिमायतनगर रेल्वे गेट ते हिमायतनगर शहरातून किनवटकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था बनली असून पहिल्यांदाच झालेल्या अवकाळी पावसाने या अंतर्गत रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या अंतर्गत रस्त्यावर आता पावसाळ्यात चिखल होणार असून रहदारीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. आता रस्ता केव्हा पुर्ण होणार असा संतप्त सवाल शहरवाशीयांतून उपस्थित केला जात आहे.

हिमायतनगर शहरातून किनवटकडे जाणाऱ्या महा मार्ग रस्त्यांचे काम गेल्या चार पाच वर्षांपासून अतिशय कासव गतीने सुरू आहे. फक्त खोदकाम करून ठेवले असल्याने प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. जनहितार्थ आमदार जवळगावकर यांनी तोंडी सुचना संबंधित ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेला देऊनही फारसा परिणाम होत नाही. हे लक्षात घेऊन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंबई येथे संबंधित विभागाचे कार्यालय गाठून निवेदन सादर केले. निवेदनात रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला होता. खरतर तेव्हाच संबंधित विभागाने आमदार जवळगावकर यांचे आंदोलन थांबवून कामाला गती देऊन ते पुर्ण करणे गरजेचे ठरणारे होते. परंतु निवेदनानंतर कोणत्याही प्रकारच्या हालचाली न करता आंदोलन छेडण्यास भाग पाडले.

आंदोलनाच्या समारोपप्रसंगी फक्त एक महिन्यात काम पुर्ण करण्याचे आश्वासन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना संबंधित यंत्रणेने दिले. परंतु दुर्दैवाने ठेकेदाराचे आश्वासन हवेतच विरले. आता पावसाळा फक्त आणी फक्त आठवड्यावर येवून ठेपला आहे. कामाला तर कुठलीच गती नाही, काम थांबूनच आहे. परवा अवकाळी पाऊस या भागात बरसला तेव्हा या अंतर्गत रस्त्यांवर एवढा चिखल झाला की वाहणे अडकून पडली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या, अतिशय परिश्रम पुर्वक मार्ग काढून प्रवाश्यानी आपले घर गाठले. या अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरणार असून हा महामार्ग बंद होण्याच्या स्थितीत येवून पोहचला आहे.

गेल्या पावसाळ्यात असेच अनेक वेळा हा रस्ता बंद पडला होता. एकदा तर आमदार जवळगावकरही बंदच्या ट्राफिक जॅम मध्ये फसले आणी तब्बल तासाभरानंतर त्यांची सुटका झाली. एकंदरच या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून प्रवाश्यांना हा अंतर्गत रस्ता फारच डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर काम पूर्ण करणे आता शक्य नाही. असे म्हणता येणार नाही. तेव्हा या बाबींकडे संबंधित प्रशासकीय यंत्रना ठेकेदार यांनी वेळीच लक्ष पुरवून कच्चा रस्ता रहदारीसाठी तितका तरी रस्ता करून प्रवाशी, नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com