नांदेड : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले- प्रा.भुयारे

प्रल्हाद कांबळे
Thursday, 3 December 2020

प्रा.सदाशिव भुयारे पुढे बोलताना म्हणाले की, क्रांतिगुरु लहुजी साळवे हे छत्रपती शिवरायांच्या राज्यातील पुरंदर किल्ल्याचे रक्षक थोरले लहुजी यांचे वंशज होते. पुरंदर किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आल्यानंतर वडील राघोजी साळवे हे त्यांच्या शूर पराक्रमामुळे दुसऱ्या बाजीरावाने राघोजी साळवे यांना आपल्या राजदरबारात बोलावून घेऊन सैन्यातील महत्त्वपूर्ण जवाबदारी दिली होती.

नांदेड - येथील विठ्ठलनगर सांस्कृतिक सभागृहात आयोजित क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे यांच्या 226 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात "क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना भाकपा युनायटेडचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रा. सदाशिव भुयारे यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले, असे प्रतिपादन केले आहे.

प्रा.सदाशिव भुयारे पुढे बोलताना म्हणाले की, क्रांतिगुरु लहुजी साळवे हे छत्रपती शिवरायांच्या राज्यातील पुरंदर किल्ल्याचे रक्षक थोरले लहुजी यांचे वंशज होते. पुरंदर किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आल्यानंतर वडील राघोजी साळवे हे त्यांच्या शूर पराक्रमामुळे दुसऱ्या बाजीरावाने राघोजी साळवे यांना आपल्या राजदरबारात बोलावून घेऊन सैन्यातील महत्त्वपूर्ण जवाबदारी दिली होती.1817 च्या खडकीच्या पेशवे आणि ब्रिटिशांच्या लढाईत राघोजी साळवे यांनी हजारो ब्रिटिश सैनिकांचा शिरच्छेद करून तब्बल 4 दिवस खिंड लढवली होती. दुसरा बाजीराव यांच्या पळकुट्यापणामुळे राघोजी साळवे यांना शहीद व्हावे लागले. त्याचवेळी वडील राघोजी साळवे यांच्या विरमरणाची रक्त आपल्या कपाळावर लावून क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी शपथ घेतली की "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" खडकीच्या लढाईत राघोजी साळवे शहीद झाल्यामुळे दुसरा बाजीराव पळून जाऊन कोरेगाव भीमा येथे लपून बसला होता.

हेही वाचा - नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु -

त्यावेळी 500 ब्रिटिश महार बटालियनच्या सैन्याचा 28000 पेशव्यांचा  दारुण पराभव केला होता. कोरेगाव भीमाच्या लढाईमुळे दुसऱ्या बाजीरावांचा अंत व शस्त्रधारी पेशवाईचा अंत झाला. परंतु क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी हार मानली नाही. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा तीव्र करण्यासाठी पुणे येथे गंजपेठेत क्रांतीकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी सशस्त्र  प्रशिक्षण  केंद्र सुरू केले ज्यात तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, बाळ गंगाधर टिळक यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतीकारकांना घडवले. त्यामुळेच भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त करणे शक्य झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावांच्या पराभवानंतर आणि पेशवाईचा अंत झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र चळवळीचे नेतृत्व क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे यांनी केले आहे, असे प्रतिपादन प्रा.भुयारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत खडसे हे होते, तर उद्‌घाटन इंजि. भाऊसाहेब घोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रदीपअण्णा वाघमारे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. राज सूर्यवंशी यांनी तर आभार गणेश मोरे यांनी मानले. शाहिद कार्यक्रमास पोचीराम कांबळे यांचे नातू ज्युनियर कांबळे, काळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत गुंडाळे, पांडुरंग गायकवाड, उत्तम हातागळे, चेतक काळे, बी.एस. घोणसेटवाड, बाबू कांबळे, उत्तम आंबेकर, प्रसाद गायकवाड, विशाल केदारे, तपासकर, वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Krantiguru Lahuji Salve led the armed freedom movement Prof. Bhuyare nanded news