esakal | राजश्री पाटील यांना मातृशोक, मुंबईत आईचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

राजश्री पाटील यांना मातृशोक, मुंबईत आईचे निधन

राजश्री पाटील यांना मातृशोक, मुंबईत आईचे निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नांदेड : खासदार हेमंत पाटील यांच्या सासूबाई व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या आई तथा यवतमाळ येथील महाराष्ट्र पोलिस पाटील संघटनेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी पुष्पाताई महल्ले यांचे कोरोना आजाराने मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल मध्ये निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ होते. पुष्पाताई यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवारी ता. १८ एप्रिल रोजी नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असून सुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकने जसलोक हॉस्पिटल मुबंई येथे दाखल करण्यात आले. सोमवारपासून उपचार सुरू असताना आचनक सकाळपासून तब्येत खालावली होती व उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अशातच मंगळवारी (ता.२७ ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी राजश्री पाटील, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

loading image