esakal | नांदेड : शेतीच्या वादातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप- जिल्हा न्यायालयाचा निकाल

बोलून बातमी शोधा

file photo

वासरी (ता. मुदखेड) येथील अवधूत शामराव येडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. एक जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता सर्व कुटुंबियांनी जेवण केल्यानंतर त्यांचे वडील शामराव नानाराव येडे (वय ५५) हे झोपण्यासाठी शेतात गेले.

नांदेड : शेतीच्या वादातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप- जिल्हा न्यायालयाचा निकाल
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेतीच्या वादातून आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या मुलास येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी मंगळवारी (ता. १६) जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

वासरी (ता. मुदखेड) येथील अवधूत शामराव येडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ता. एक जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता सर्व कुटुंबियांनी जेवण केल्यानंतर त्यांचे वडील शामराव नानाराव येडे (वय ५५) हे झोपण्यासाठी शेतात गेले. शामराव येडे यांनी तीन लग्न केले होते. त्यातील अवधूत तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. ता. एक जानेवारी २०१८ च्या मध्यरात्री त्यांचे काका किशनराव यांनी घरी येऊन अवधूत येडेला सांगितले की रात्री भाऊ शामराव च्या शेतातून आवाज आला तेव्हा मी तिकडे जात असताना तुझा भाऊ संभा हातात तलवार घेऊन पळत होता. जाऊन पाहिले असता शामरावच्या डोक्यावर मागच्या बाजूने जखमा होत्या. सर्वांनी शामरावला उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे आणले. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

हेही वाचा -  बाळा आता थोडा वेळ तरी पुस्तक घे...! पालकांची बालकांना विनवणी; शाळा बंद, पण तळमळ चालू

या अगोदर मुदखेड पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक १ / २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल होता. शामराव त्याच्या मृत्यूनंतर त्या प्रकरणात ३०२ कलमाची वाढ झाली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी केला होता. न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक ५९/ २०१८ यानुसार चालले. या प्रकरणातील मारेकरी आरोपी संभा शामराव येडे यांनी शंखतीर्थ शिवारातील गट क्रमांक १७५ मधील चार एकर शेती विक्री केली होती. त्याबद्दल वाद सुरु होता. शामरावच्या पहिल्या पत्नीचा मुलगा संभा आहे. त्याने ही जमीन सन २०१५ मध्ये विकली होती. न्यायालयात या प्रकरणी १२ साक्षीदारांनी आपल्या जबाब नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश खरात यांनी शामराव येडे यांचा खून केल्याप्रकरणी संभा शामराव येडेला दोषी ठरवून जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. संजय लाटकर यांनी काम पाहिले.