नांदेड : 'महात्मा बसवेश्वर' जयंती ऐतिहासिक ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Mahatma Basaveshwar Jayanti Planning meeting

नांदेड : 'महात्मा बसवेश्वर' जयंती ऐतिहासिक ठरणार

नांदेड : बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक व देशातील करोडो वीरशैव -लिंगायत बांधवाचे श्रद्धास्थान महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षीप्रमाणे यंदाही ता. तीन मे रोजी जयंती साजरी होत आहे. यावर्षीच्या जयंतीला वेगळे महत्त्व असून जयंती अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास जयंती समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी व्यक्त केला.

शिवा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बुधवारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समितीचे कार्याध्यक्ष वैजनाथ तोंनसुरे, कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल माळगे, शंकरराव पत्रे, दिगंबर मांजरमकर, वीरभद्र बसापुरे, नंदाताई पाटील, सत्यभामा येजगे, शुभम घोडके, नंदू आप्पा देवणे, सिद्धेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.

श्री. पांडागळे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासूनची वीरशैव - लिंगायत बांधवांची मागणी आता पूर्ण झाली आहे. पुतळा निर्मितीनंतर होणाऱ्या पहिल्या जयंतीला समाज बांधवांनी उपस्थित राहून ही जयंती ऐतिहासिक करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत कार्याध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, विठ्ठल ताकबिडे, शंकरअप्पा पत्रे, पंडित कदम आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक दिगंबर मांजरमकर यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी कहाळेकर यांनी केले. जी. एस. मंगनाळे यांनी आभार मानले.

बैठकीला विजय हिंगमिरे, बाबुराव कैलासे, संभाजी पावडे, शिवराज उमाटे, श्रीकांत आरसेवार, संजय पाटील चिटमुगरेकर, विलास कापसे, संग्राम काडवदे, प्रकाश कांचनगिरे, बालाजी कोंडलवाडे, सदाशिव बोडके, राम भातांब्रे, अभिषेक पाटील, प्रकाश जाळगे, बालाजीराव अल्लम खाने, शिवा गिराम, नंदू येरगे, माधव भोकणे, शिवराज भोसीकर, शिवराज दरकासे, विठ्ठलराव मुखेडकर, संजय अकोले, माधव कंधारे आदी उपस्थित होते.

Web Title: Nanded Mahatma Basaveshwar Jayanti Planning Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedSakalMeeting
go to top