शुक्रवारी २१६ रुग्ण कोरोनामुक्त, सहा रुग्णांचा मृत्यू , तीन हजारापेक्षा अधिक बाधितावर उपचार सुरू, एक हजार अहवाल प्रतिक्षेत 

शिवचरण वावळे
Friday, 2 October 2020

शुक्रवारी (ता. दोन) ८५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६७८ निगेटिव्ह, तर १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार ५९ वर जाऊन पोहचली आहे. 

नांदेड - मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली हा नांदेडकरांसह प्रशासनाला दिलासा की, किटच्या कमतरतेचा परिणाम म्हणावा. शुक्रवारी (ता. दोन) प्राप्त झालेल्या अहवालात १५८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, २१६ रुग्ण कोरोनामुक्त तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

गुरुवारी (ता. एक) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या एक हजारापेक्षा अधिक स्वॅबपैकी शुक्रवारी (ता. दोन) ८५२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६७८ निगेटिव्ह, तर १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार ५९ वर जाऊन पोहचली आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबातील पाच जणांनी घेतली सहस्त्रकुंड धबधब्यात उडी

सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैभव नगर नांदेड पुरुष (वय ८७), पूर्णा रोड नांदेड पुरुष (वय ७२), टिळकनगर नांदेड पुरुष (वय ९१), भोकर पुरुष (वय ४८) या चार रुग्णांचा व जुना मोंढा नांदेड पुरुष (वय ५५) व विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील बडूर तालुका बिलोली पुरुष (वय ३०) असे सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरात आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४१२ इतकी झाली आहे. 

आतापर्यंत १२ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त 

दहा दिवसाच्या औषधोपचारानंतर गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय- १५, विष्णुपुरी शासकीय रुग्णालय १७, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १०९, बिलोली एक, नायगाव नऊ, मुखेड २६, लोहा आठ, धर्माबाद दोन, किनवट आठ, मुदखेड तीन, उमरी एक, खासगी रुग्णालय १४, लातूर एक असे २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १२ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- Video - जंगलराज विरोधात काँग्रेस रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत आंदोलन

३८ रुग्णांची प्रकृती गंभीर

शुक्रवारी नांदेड महापालिका हद्दीत - ७७, नांदेड ग्रामीण- २३, किनवट-दोन, कंधार-आठ, बिलोली-चार, अर्धापूर-सहा, हदगाव- दोन, धर्माबाद- सहा, भोकर-एक, देगलूर-दोन, नायगाव- एक, मुदखेड- चार, मुखेड- दहा, माहूर- दोन, लोहा- एक, उमरी- एक, सोलापूर- एक, नागपूर- एक, हिंगोली- चार, बीड- एक व रायगड- एक असे १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १६ हजार ५९ झाली असून, १२ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, सध्या तीन हजार १८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे
 
नांदेड शुक्रवार कोरोना मीटर 

शुक्रवारी पॉझिटिव्ह- १५८ 
शुक्रवारी कोरोनामुक्त- २१६ 
शुक्रवारी मृत्यू- सहा 
उपचार सुरू- तीन हजार १८२ 
गंभीर रुग्ण- ३८ 
अहवाल प्रतिक्षा- एक हजार ३७२ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: As many as 216 patients were released from the corona on Friday, six died, more than 3,000 were undergoing treatment and 1,000 reports were awaited Nanded News