नांदेड : जिल्ह्यातील अनेक रस्ते झाले राज्यमार्ग

जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत; आमदार बालाजी कल्याणकर यांना यश
Nanded Many roads became state highways
Nanded Many roads became state highwayssakal

नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अनेक दिवसांपासून नांदेड उत्तर मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्ग हे राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत व्हावेत, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून ता. आठ जून आणि ता. १४ जून रोजी शासनाने परिपत्रक काढून नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते हे राज्य मार्ग तसेच जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत केले आहेत.

या परिपत्रकात राज्यमार्ग ६१ पासून हिवरा - परभणी जिल्हा सीमा तळणी - खडकी - मरळक बुद्रुक - पावडेवाडी - सुगाव खुर्द - सुगाव बुद्रुक - कोटीतीर्थ - थुगाव - बोरगाव तेलंग ते प्रजिमा - ८४ पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झाला आहे. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमत ते अर्धापूर, नांदेड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते राज्य मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत अनेक दिवसापासून आमदार कल्याणकर प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शासनाने ता. आठ जून रोजी परिपत्रक काढून राज्य महा मार्ग - ७५२ आय पासून अंबा चोंडी, कुरुंदा, टोकादेवी, गिरगाव, मालेगाव, पासदगाव, तरोडा नाका, शिवमंदिर, तरोडा बुद्रुक, शेलगाव, दाभड ते राज्य महा मार्ग ३६१ पर्यंत रस्ता हा प्रमुख राज्य मार्ग म्हणून केला आहे. तसेच यावेळी उत्तर मतदारसंघातील जिल्हा मार्ग रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत देखील झाले आहेत.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे आभार : कल्याणकर

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नांदेडचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील विविध रस्ते राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत केल्याबद्दल नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com