esakal | नांदेड : चैनीच्या वस्तुंसाठी विवाहितेचा छळ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लग्नात टीव्ही, वॉशिंग मशीन आणि दुचाकी दिली नाही म्हणून एका विवाहितेला मारहाण करुन घराबाहेर हाकलून देण्यात आले.

नांदेड : चैनीच्या वस्तुंसाठी विवाहितेचा छळ

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लग्नात टीव्ही, वाशिंग मशीन, दुचाकी व अन्य चैनिच्या वस्तु दिल्या नसल्याने त्या आता घेण्यासाठी माहेरहून पैशाची मागणी करुन एका विवाहितेला त्रास देणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लग्नात टीव्ही, वॉशिंग मशीन आणि दुचाकी दिली नाही म्हणून एका विवाहितेला मारहाण करुन घराबाहेर हाकलून देण्यात आले. एवढेच नाही तर जोपर्यंत या सर्व वस्तू माहेराहून विवाहिता आणत नाही तोपर्यंत नांदविणार नसल्याचा दमही भरला. शहरातील सिडको भागात राहणाऱ्या विवाहितेला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचबरोबर लग्नात टीव्ही. वॉशिंग मशीन आणि दुचाकी दिली नाही म्हणून उपाशी ठेवून तिला मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावरचे दागिने काढून तिला घराबाहेर हाकलुन देण्यात आले. त्यानंतर पिडीतआपल्या माहेरी आली. सासरची मंडळी माहेरी पोचली. जोपर्यंत सांगितलेल्या वस्तू आणत नाही तोपर्यंत नांदवणार नाही. तसेच दुसरे लग्न करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित यांच्या तक्रारीवरून सुमित सुभाष पंतलवार, शकुंतला पंतलवार, सुभाष पंतलवार आणि पवन पंतलवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक इनसमवार करीत आहेत.

हेही वाचा हिंगोली : कळमनुरीत धुमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्या युवकांची संख्या वाढली

पहिली सोडून दुसरीसोबत घरोबा

आॅटो घेण्यासाठी माहेराहून पन्नास हजार रुपयांची मागणी करुन एका विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे घडली. पीडित विवाहितेला पैशासाठी त्रास देण्यात आला. त्यानंतर मारहाण करून घराबाहेर हाकलण्यात आले. तसेच माहूर येथील मुलीशी घरोबा केला या प्रकरणात गौतम धुळे, कमलाबाई धुळे, प्रवीण धुळे आणि कविता कांबळे यांच्या विरोधात तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.