esakal | नांदेड : मातंग समाजासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरण करावे- शिवराज दाढेल लोहेकर 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

समाजातील कार्यकर्ते व युवकांच्या उपस्थितीत मातंग समाजाचे दहा ठराव घेण्यात आले. मातंग समाजाला लोकसंखेच्या नुसार अ. ब. क. ड. आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे,

नांदेड : मातंग समाजासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरण करावे- शिवराज दाढेल लोहेकर 

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : एक दिवसीय आंदोलनात मातंग समाजासाठी लोकसंख्येनुसार वर्गीकरण करण्यात यावे आण्णाभाऊ साठे विकास मंडळ सुरु करण्यात यावे या आणि इतर मागण्यासाठी लोह्यात सोमवारी  (ता. आठ) तहसिल कार्यालयासमोर शिवराज दाढेल लोहेकर यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले. 

समाजातील कार्यकर्ते व युवकांच्या उपस्थितीत मातंग समाजाचे दहा ठराव घेण्यात आले. मातंग समाजाला लोकसंखेच्या नुसार अ. ब. क. ड. आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ चालु करण्यात यावे, ता. एक. ऑगस्ट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, बार्टीच्या धरतीवर आरटी स्थापन करावी, लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथे करण्यात यावे, आण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, लहुजी साळवे अभ्यास आयोग शिफारशीनुसार लागू करण्यात यावा. भूमिहीन नागरिकांना जागा व गायरान जमीन नावाने करण्यात यावे, आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, दिल्ली येथे शेतकऱ्याच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा असून ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचानांदेड जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीत 82 मतदारांची वाढ; प्रतिनिधींची संख्या 858 वरुन 940

नगरसेवक करिम शेख, शिवसेनेचे व पंचायत समितीचे सदस्य बापू उर्फ नवनाथ चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सतिश आनेराव, दत्ता सेठे, सदानंद धुतमल, श्याम पाटील नळगे, पिंटूअप्पा वड्डे, प्रा. ज्ञानेश्वर डाखोरे, बालाजी जाधव, एम. आय. एमचे तालुका अध्यक्ष निहाल मन्सुरी, प्रा. बाळासाहेब जाधव, योगेश चव्हाण, खंडु पाटील पवार, शिवराज पाटील पवार, पद्माकर सावंत, लक्ष्मण फुलवरे आदीसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image