esakal | नांदेड - सोमवारी ३४१ रुग्ण कोरोनामुक्त, ३५३ अहवाल पॉझिटिव्ह; ५८ जणांची प्रकृती गंभीर 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

लॉकडाउननमध्ये सुट देण्यात आल्यापासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. रविवारी (ता. १३) घेण्यात आलेल्या स्वँबपैकी सोमवारी ३५३ जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८३७ इतकी झाली आहे

नांदेड - सोमवारी ३४१ रुग्ण कोरोनामुक्त, ३५३ अहवाल पॉझिटिव्ह; ५८ जणांची प्रकृती गंभीर 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र, असे असले तरी त्यासोबतच कोरोनावर उपचार करुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सोमवारी (ता. १४) एक हजार ६२ जणांचे स्वँब अहवाल प्राप्त झाले. यात ६६५ निगेटिव्ह आले तर ३५३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे दिवसभरात ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

लॉकडाउननमध्ये सुट देण्यात आल्यापासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. रविवारी (ता. १३) घेण्यात आलेल्या स्वँबपैकी सोमवारी ३५३ जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८३७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात कैलासनगर नांदेड पुरुष (वय ७०), दिग्रस (ता. अर्धापूर) पुरुष (वय ६०), बालाजीमंदीर परिसर मुखेड महिला (वय ६८), हनुमानगड नांदेड महिला (वय ५१), मगनपुरा नांदेड पुरुष (वय ६५), बजरंग कॉलनी नांदेड पुरुष (वय ६३) व गोजेगाव (ता. हदगाव) येथील महिला (वय ७५) या सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा-Video-आरक्षण टिकविण्याची जबाबदारी विरोधकांचीही : नानासाहेब जावळे ​

सात हजार ६९६ रुग्ण कोरोनावर मात 

दरम्यान, उपचारानंतर बरे झालेल्यामध्ये विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील १९, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा रुग्णालयातील सात, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन व होम आयसोलेशन मधील १९३, बिलोलीतील आठ, अर्धापूरला १३, धर्माबादला सहा, माहूरला नऊ, मुखेडला पाच, हदगावचे आठ, कंधारचे पाच, मुदखेडला २३, नायगावला चार, उमरीत आठ आणि खासगी रुग्णालयातील ३३ असे ३४१ रुग्ण दहा दिवसाच्या उपचारानंतर कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत सात हजार ६९६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- स्थावर मिळकतीच्या दरात दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ, क्रेडाई दरवाढीच्या पुनर्विचारासाठी शासनाला विनंती करणार

५८ रुग्णांची प्रकृती गंभीर 

सोमवारी आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटच्या माध्यमातून नांदेड महापालिका क्षेत्रात १८९, नांदेड ग्रामीणमध्ये १२, अर्धापूरमध्ये १४, लोह्यात २४, भोकरला दोन, मुखेडला २८, बिलोलीत सहा, मुदखेडला आठ, किनवटला १०, धर्माबादला १५, हदगावला दोन, नायगावला ११, उमरीत १३, कंधारला दोन, देगलूरला आठ, परभणीतील दोन, हिंगोलीतील सात, बीडमधील एक असे ३५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. सध्या तीन हजार ७६१ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असून, त्यापैकी ५८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार १८३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - ११ हजार ८३७ 
आज सोमवारी पॉझिटिव्ह - ३५३ 
आज सोमवारी कोरोनामुक्त - ३४१ 
एकूण कोरोनामुक्त - सात हजार ६९६ 
आज सोमवारी मृत्यू - सात 
एकुण मृत्यू - ३१८ 
सध्या उपचार सुरु - तीन हजार ७६१ 
गंभीर रुग्ण - ५८ 
अहवाल प्रतिक्षेत - एक हजार १८३