Video-आरक्षण टिकविण्याची जबाबदारी विरोधकांचीही : नानासाहेब जावळे

शिवचरण वावळे
Monday, 14 September 2020

सोमवारी (ता.१४) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव काळे, दशरथ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणा विषयीची भूमिका मांडताना श्री. जावळे म्हणाले

नांदेड : केंद्र व राज्य सरकारने आपसातील मतभेद विसरुन मराठा आरक्षणासाठी जे-जे करता येईल ते केले पाहिजे. राज्यसरकार सोबतच विरोधकांची देखील आरक्षण टिकविण्यची जबाबदारी आहे, असे स्पष्ट मत अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी व्यक्त केले. 

मराठवाडा मराठा युवा संघटनेच्या विभागीय बैठकीनिमित्त नांदेडला आले असता सोमवारी (ता.१४) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव काळे, दशरथ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणा विषयीची भूमिका मांडताना श्री. जावळे म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मराठा समाजाला आरक्षणाची संधी आली होती. परंतू सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही. 

हेही वाचा- स्थावर मिळकतीच्या दरात दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ, क्रेडाई दरवाढीच्या पुनर्विचारासाठी शासनाला विनंती करणार​

मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला 

मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रयत्न कमी पडले आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. असे असलेतरी, मराठा समाज हा कुण्या एका पक्षाचा नाही. तो सर्वच पक्षांचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षण टिकविण्यासाठी विरोधकांनीही प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु, तसा प्रयत्न झालेला नाही. आणि मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने, मराठा समाज संतप्त झाला आहे. 

हेही वाचले पाहिजे- विक्की चव्हाण खून प्रकरणातील आरोपीला पोलिस कोठडी ​

आम्हाला शहाणपण शिकवू नये 

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास शासनाविरोधात मराठा समाज थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर गोळ्या घातल्यातरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही श्री. जावळे यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारला तीन दिवसाचा अवधी देण्यात असून, त्यानंतर मोर्चे आंदोलन करु नका, शांतता राखा असे आम्हाला शहाणपण शिकवू नये अशीही टिपणी श्री. जावळे यांनी केली आहे. 

...तर १७ सप्टेंबरला आंदोलन करणार
मराठा आरक्षणाविषयी ठाकरे सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास १७ सप्टेंबर रोजी आंदोलनाची भूमिका घेणार आहे. मात्र, हे आंदोलन कशा स्वरूपाचे असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. 
- नानासाहेब जावळे, केंद्रीय कार्याध्यक्ष, अखिर भारतीय छावा संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opponents also have responsibility to maintain reservation: Nanasaheb Jawale Nanded News