नांदेड : आई, मुलीला मालमत्तेपासून ठेवले वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 properties

नांदेड : आई, मुलीला मालमत्तेपासून ठेवले वंचित

नांदेड : आई व मुलीला वारस असताना देखील मालमत्तेपासून वंचित ठेवले तसेच खोटे व बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून फसवणुक केल्याच्या आरोपावरून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ता. २२ जुलै ते ता. १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान शिवाजीनगर येथील सेंटर पॉईंट येथे आरोपितांनी दिवाणी दावामधील तडजोडीने झालेला हुकुमनामा हेतुपरस्पररित्या लपवून ठेवला. स्वतःच्या फायद्यासाठी तुळशीराम मोंडे यांचे खोटे व बनावट मृत्यू प्रमाणपत्र बाऱ्हाळी (ता. मुखेड) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून तयार करून सदरचे प्रमाणपत्र खरे आहे, असे भासवून फसवणुक केली. त्यानंतर आरोपी यांच्या हक्कात दुय्यम निबंधक कार्यालयातून विक्रीखत करून देणे तसेच मृत्यू प्रमाणपत्र व स्वतःची अपूर्ण व वास्तविक माहिती लपवून भूमी अभिलेख आणि महापालिका कार्यालयाकडून स्वतःचे नाव परिवर्तन करून सदर मालमत्तेवर केवळ स्वतःच्या हक्कामध्ये बांधकाम परवानगी काढण्याचा अर्ज सादर केला. आरोपितांची कृत्ये ही फिर्यादीस तसेच मयत तुळशीराम मोंडे यांच्या इतर वारसांना मालमत्तेपासून वंचित ठेवण्याच्या हेतूने सदर कृत्य केले तसेच न्यायालयाच्या आदेशाने सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

त्यामुळे पोलिसांनी याबाबत कुंदा सुरेश मोंडे (वय ५४) आणि अमृता सुरेश मोंडे (वय २३, दोघेही रा. वजिराबाद, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जर्नादन तुळशीराम मोंडे (वय ८५, रा. दिल्ली पूर्व), रमेश तुळशीराम मोंडे (वय ७५), मनिष रघुनाथ मोंडे (वय ४५, दोघे रा. बिडवई कॉम्प्लेक्स, श्यामनगर, नांदेड) आणि विठ्ठल मोनप्पा शेट्टी (वय ५१, रा. आर्या हाईट्स, शारदानगर, नांदेड) या चौघांविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार रोडे करत आहेत.

loading image
go to top