नांदेड : मुदखेड भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र आघाडी शासनाचा जाहीर निषेध 

गंगाधर डांगे
Wednesday, 7 October 2020

आंदोलनात यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे ,भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर,मुदखेड ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड , शहर अध्यक्ष पुरुषोत्तम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुदखेड  (जिल्हा नांदेड) : भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वात मुदखेड येथे आज ता. ७ रोजी सकाळी ११:३० वाजता आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे ,भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर,मुदखेड ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड , शहर अध्यक्ष पुरुषोत्तम चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.                         

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ता.१० ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार ( प्रचलन आणि सुविधा ) विधेयक संसदेत मंजूर केले व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना निर्देशित केले. परंतु त्या आदेशाला स्थगिती देण्याचा स्थगिती आदेश ता. ३० सप्टेबर रोजी महाराष्ट्र आघाडी शासनाने काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा स्थगिती आदेश असल्यामुळे सबंध जिल्हयात ठिकठिकाणी त्याची होळी करून हा स्थगिती आदेश मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचाएसीबीचा व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळणारा लाचखोर पोलिस कोठडीत -

आंदोलनात यांची होती उपस्थिती

महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजीही करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजयुमोचे तालुकाध्यक्ष देवा पाटील धबडगे, कैलाश शिंदे, माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले, प्रकाश बालफेवाड, अशोक पवार, संजय पवार, माधावसिंग ठाकूर , मारोतराव आवातीरक, श्री. यलबकर, सरपंच बालाजी पाटील मगरे, गजानन कमळे, अमोल पाटील अडकीने, प्रकाश पाटील सूर्यवंशी, कालिदास जंगीलवाड, गोविंद शिंदे, सुरेश फुलारी, विजय आवातीरक, गजानन लखे, श्याम लखे, भगवान पुयड, सुरेश कल्याणे, पवन टिपरसे, पिंटू येरपालवाड आदीसह भाजपचे ग्रामीण कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.

शारिरीक अंतर नियमांची पायमल्ली

आंदोलनादरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नसल्याचे दिसत होते. काही कार्यकर्ते तर आपल्या तोंडाला मास्क बांधलेला दिसले नाहीत. भाजपाच्या या आंदोलनामुळे काही कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग व नियमाचे उल्लंघन करीत नियमांना तिलांजली दिली होती.

येथे क्लिक करा - नांदेड : वाळू माफियाकडून नायब तहसिलदारावर हल्ला, मुगाजी काकडे जखमी

अशोक चव्हाणच्या बालेकिल्ल्यात आंदोलन

मुदखेड तालुका हा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री कथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघाचा प्रमुख भाग असून मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या या बालेकिल्लामध्ये जिल्ह्यात अनेक आंदोलने करत आहेत. विशेष म्हणजे भाजपाच्या मुदखेड येथे होणाऱ्या अनेक चळवळीमध्ये जिल्हास्तरीय भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसून येत आहेत. यामागे भाजपची राजकीय खेळी वेगळीच दिसून येते.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Mudkhed Bharatiya Janata Party's public protest against the Maharashtra Front government nanded news