नांदेड : व्यापाऱ्यांना ६० हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Ban plastic use

नांदेड : व्यापाऱ्यांना ६० हजारांचा दंड

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली. रविवारी महापालिकेतील सहा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अकरा व्यावसायिक आस्थापनांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला; तसेच उपद्रव करणाऱ्यांकडून १२ हजार आठशे रुपयांचा दंड असा एकूण ७२ हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पथकांनी एकूण २९१ दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. एकूण ३२१ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नीलेश सुंकेवार यांच्या नियंत्रणाखाली क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. व्यापारी, प्रतिष्ठाने, दुकाने व नागरिकांनी शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करू नये. कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त सुंकेवार यांनी केले आहे.

Web Title: Nanded Municipal Action Banned Plastics Traders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..