esakal | नांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका नांदेड

नांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’ परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः महापालिका ‘हॉटस्पॉट' परिसराची माहिती लपवित असल्याने अनेक नागरिक बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेने हॉटस्पॉट परिसराची माहिती दररोज जाहीर केल्यास त्या-त्या परिसरातील नागरिक सावध होण्याची शक्यता आहे. यातून काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण शक्य आहे. परंतु महापालिकेकडूनच कोरोनावर नियंत्रणाच्या या पर्यायावर माती टाकली जात असल्याचे चित्र आहे.

शहरात कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह सारेच अधिकारी दिशाहीन कामे करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता अनेक परिसर प्रतिबंधित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. परंतु महापालिकेकडून हॉटस्पॉट परिसराबाबतच माहिती लपविली जात असल्याचे दिसून येत आहे. कुठल्या परिसरात सर्वाधिक बाधित आहे, याबाबतची माहिती लपवून महापालिका एकप्रकारे नागरिकांना आणखी धोकादायक स्थितीत घेऊन जात असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.

हेही वाचा - सेलूत साकारतेय शंभर बेडचे मोफत कोविड सेंटर- संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

खर्च वाचविण्याचा प्रयत्न ः

हॉटस्पॉट परिसर जाहीर केल्यास ते क्षेत्र प्रतिबंधित करावे लागणार आहे. त्यासाठी टिन, लाकडी साहित्य आदी बिछायत केंद्रांकडून मागवावे लागणार आहे. यासाठी अर्थातच महापालिकेचा खर्च वाढणार आहे. यापूर्वी अनेक बिछायत केंद्र संचालकांचे पैसे अद्यापही महापालिकेने दिले नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

सोशल मिडियावर महापालिकेची अब्रू वेशीला ः

सोशल मिडियावर कोरोनाची सद्यस्थिती व मागील स्थितीची तुलना करण्यात येत आहे. एवढेच नव्हे काही ग्रुपवर महापालिकेचे बाधितांसाठी असलेल्या नियंत्रण कक्षाबाबतच शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातून आताचे आयुक्त डॉ. सुनील लहाने व माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या कार्याची तुलना केली जात आहे. यात अनेक नागरिक मत व्यक्त करताना महापालिकेची अब्रू काढत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top