नांदेड : एकल वापर प्लास्टिक वस्तूंच्या वापरास बंदी

ता. एक जुलैपासून महापालिका करणार कार्यवाही
Nanded Ban single use plastic
Nanded Ban single use plasticsakal

नांदेड : राज्य शासन अधिसूचना - २०१८ अन्वये महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ता. १२ ऑगस्ट २०२१ मधील तरतुदीनुसार एकल वापर प्लास्टिक (सिंगल युज प्लॅस्टिक) वस्तूंची निर्मीती, आयात, साठवणुक, वितरण विक्री व वापरास प्रतीबंध करण्यात आले आहे. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

एकल वापर प्लास्टिक वस्तूं जसे की, सजावटीचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे, प्लास्टिकच्या काडयांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काडया, प्लास्टिकचे झेंडे, कँन्डी कांडया, आइस्क्रीम कांडया, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, चाळण्या, शंभर मॉयक्रॉनपेक्षा कमी असलेले प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर अशा वस्तूंची उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतुक करणे बाबत प्रतिबंधित केले आहे.

या संदर्भात शुक्रवारी स्थानिक प्लास्टिक विक्री व्यापारी, महापालिकेचे क्षेत्रिय अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. सदरील बैठकित उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी प्लास्टिक बंदीचे महत्व व एकल वापर प्लास्टिकमध्ये कोणते घटक येतात या बाबत मार्गदर्शन करुन व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

तसेच ता. एक जुलैपासून एकल वापर प्लास्टिक वापर वाहतुक, साठवणुक व विक्री करण्यास प्रतिबंधित असुन नियमांचे उल्लंघन केल्यास प्रथम वेळेस पाच हजार रुपये, दुसऱ्या वेळेस दहा हजार तर तिसऱ्या वेळेस २५ हजार रुपये आणि तीन महिन्याचा कारावास अशा प्रकारे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे. तेव्हा नागरीक व व्यवसायीकांनी एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर न करता त्यास पर्यायी विघटनशिल वस्तुंचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com