राजकारण तुमचे, मरण नांदेडकरांचे!

दहा दिवसांपासून शहर अंधारात : टॉर्चच्या उजेडात करावा लागला अंत्यविधी
Nanded Municipal Corporation elected leaders negligence
Nanded Municipal Corporation elected leaders negligence sakal

नांदेड : महापालिका, निवडून दिलेले नगरसेवक आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शहरात दहा दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य कायम आहे. हा त्रास कमी म्हणून की काय विज बिलापोटी पथदिवे बंद असल्याने स्मशानभूमीत रात्री चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. यासह वार्डातील स्वच्छतेचा बोजवारा, दोन तीन दिवसाला मिळणारे पाणी, मुलभुत सुविधांची वाणवा या समस्यांना नागरिक हैराण झाले आहेत.

नांदेड शहराचा विकास कॉंग्रेसचे नेते तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे करु शकतात, या विश्वासानेच नांदेडकरांनी महापालिकेत कॉंग्रेसला एकहाती सत्ता दिली. नांदेडकरांचा विश्वास कायम ठेवत पालकमंत्री चव्हाण यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात शहरातील विकास कामांना व महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. मात्र, या निधीतून विकासकामे करण्यास महापालिका व निवडून दिलेले नगरसेवक कमी पडत असल्याचे उघड होत आहे. केवळ महावितरण सोबत वीज बिलासंदर्भात असलेल्या वादावर तोडगा काढण्यात मनपा अयशस्वी ठरली आहे.

यामुळे नांदेड शहरातील पथदिव्यांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. परिणामी शहरात गेली दहा दिवसापासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना रात्रीच्यावेळी दहशतीखाली वावरावे लागत आहे. अंधाराचा फायदा घेवून चोरटेही सक्रिय झाले आहेत. तर टुकार आणि नशाबाज गुन्हेगाराकडून महिला, मुलींना छेडछाडीचा सामना करावा लागत आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी मनपा व नगरसेवक काही झालेच नाही, या अविर्भावात वावरत आहेत. तर एरव्ही नेत्याचे आदेश मिळताच किरकोळ कारणावरून आंदोलन करणारे विरोधकांनाही उशिरा जाग आली आहे.

एकिकडे अंधार तर काही ठिकाणी झगमगाट

शहरात एकिकडे अंधार असताना काही पदाधिकाऱ्यांच्या परिसरात पथदिव्यांचा झगमगाट दिसून येत आहे. पथदिवे बंद असल्याने स्मशानभूमितही अंधार पसरला आहे. या भयान परिस्थितीमुळे शनिवारी रात्री काही नातेवाईकांना मोबाईल टाॅर्चच्या उजेडात मयतावर अंत्यसंस्कार करावे लागले. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना उद्देशून राजकारण तुमचे, मरण नांदेडकरांचे अशी संतप्त भावना नांदेडकरांधून उमटत आहे.

  • शहरातील एकूण पथदिवे ः ६२६

  • एकूण थकबाकी ः नऊ कोटी ७० लाख रुपये

  • पाणीपुरवठ्यासाठी ः १५ उच्च दाबाचे कनेक्शन

  • एकूण थकबाकी ः ३९ कोटी ९८ लाख रुपये

  • पथदिवे व पाणीपुरवठा थकबाकी ः ५१ कोटी

  • सध्या बंद असलेले पथदिवे ः १५१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com