Nanded Municipal Corporation : महापालिकेला मिळाले सव्वाचार कोटींचे उत्पन्न ; २६ गाळे,ऑनलाइन पहिलाच प्रयोग

नांदेड वाघाळा महापालिकेच्या काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राच्या समोरील व्यापारी संकुलातील ३१ गाळ्यांसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन लिलावाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ३१ गाळ्यांपैकी २६ गाळ्यांचा लिलाव झाला असून त्यातून महापालिकेला चार कोटी २७ लाख ८५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
nanded
nandedsakal

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राच्या समोरील व्यापारी संकुलातील ३१ गाळ्यांसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन लिलावाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ३१ गाळ्यांपैकी २६ गाळ्यांचा लिलाव झाला असून त्यातून महापालिकेला चार कोटी २७ लाख ८५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर दर महिन्याला ८० हजार रुपयांचा उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी महापालिकेचे आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी उत्पन्नवाढीच्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली. त्यानुसार महापालिकेत अधिकारी व विभागप्रमुखांचा एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्यातूनच महापालिकेने काबरानगर भागात ३१ गाळ्यांचे संकुल उभारण्यास सुरूवात केली आहे. या गाळ्यांचा ई लिलाव गुरूवारी (ता. एक) पार पडला. त्यात २६ गाळ्यांचा लिलाव झाला आहे. एका गाळ्यास एका महिन्याला तीन हजार ७५ रुपये भाडे ठरले आहे. त्याचबरोबर ई लिलावातून महापालिका प्रशासनाला चार कोटी २७ लाख ८५ हजार ३९२ रूपये मिळाले आहेत.

nanded
Nanded News : महापालिकेत उपायुक्तपदी अजितपालसिंघ संधू

महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा मालमत्ता व्यवस्थापक अजितपालसिंघ संधू यांनी हा व्यापारी गाळ्यांच्या लिलावाचे नियोजन केले. या लिलावामध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के प्रमाणे दोन गाळे, महिला सहाय्यता बचत गटासाठी ३० टक्केप्रमाणे नऊ गाळे आणि अनुसुचित जाती, जमाती व विमुक्त भटक्यांसाठी पाच टक्के प्रमाणे दोन गाळे आरक्षित ठेवण्यात आले. तसेच खुल्या प्रवर्गासाठी १८ गाळे ठेवण्यात आले होते. ३१ पैकी २६ गाळ्यांचे लिलाव झाले असून पाच गाळे शिल्लक आहेत. त्यामध्ये महिला बचत गटाच्या राखीव चार आणि खुल्या प्रवर्गातील एक गाळ्यासाठी एकही इच्छुक समोर आला नाही त्यामुळे त्याचा लिलाव होऊ शकला नसल्याचे श्री. संधू यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com