‘सावित्रींचा सृजनोत्सवा’चे महापालिकेतर्फे आयोजन

शिक्षण, महिला व बालकल्याणतर्फे कार्यक्रम; अधिकाऱ्यांच्या जीवन साथींसोबत मुलाखती
Nanded Mincipal
Nanded Mincipal Sakal

नांदेड - नांदेड - वाघाळा महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीतर्फे ''सावित्रींचा सृजनोत्सव'' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नांदेडमधील अधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात नांदेडमधील प्रशासकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या प्रगट मुलाखती मुलाखतकार प्रा. डॉ. नीता पानसरे- वाळवेकर घेणार आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि डॉ. शालिनी इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील आणि अश्विनी लहाने, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार आणि सारिका शेवाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे आणि गणेश घुगे यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात या सर्व अधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.या प्रकट मुलाखतीमध्ये हे सर्व अधिकारी कसे घडले, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यांचे छंद, आवडी निवडी, सध्याचे दैनंदिन कार्यक्रम याबद्दल नांदेडकरांना अवगत करून दिले जाणार आहे. या मुलाखतीमधून विद्यार्थ्यांना भविष्यात जबाबदार नागरिक, संवेदनशील अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे.

या कार्यक्रमात सीताभाभी मोहनराव (संगीत), आशाताई पैठणे (शिक्षक), दीपा बियाणी (पत्रकारिता), अनुजा डोईफोडे (पत्रकारिता), डॉ. तस्नीम पटेल (सामाजिक), डॉ. अमन बरारा, वृषाली जोगदंड पाटील (क्रीडा) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता कुसुम सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मंत्री डी. पी. सावंत, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार अमर राजूरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा नेरलकर, उपसभापती आयेशा बेगम शेख व समितीच्या सदस्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com