Nanded: नगरपंचायत निवडणूकीत जुन्यांना हटवा‌, तरुणांना संधी द्या : काँग्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपंचायत निवडणूकीत जुन्यांना हटवा‌, तरुणांना संधी द्या : काँग्रेस

नगरपंचायत निवडणूकीत जुन्यांना हटवा‌, तरुणांना संधी द्या : काँग्रेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : प्रत्येक निवडणुकीत पक्षासाठी हिरिरीने काम करणाऱ्या तरुणांना निवडणुकीत उमेदवारी द्यावी व जुन्यांना हटवा‌ अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकाकडे कार्यकर्त्यांनी केली. या मागणीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला. तसेच शहरातील विविध समस्या विकास कामे ‌‌‌‌‌‌‌‌‌बाबतीत मंगळवारी (ता.२३) भावना व्यक्त केल्या.

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरूवात केली असून पक्षनिरिक्षकांनी विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी यांच्या मते ऐकून घेतली. शहरातील काँग्रेस कार्यालयात निवडणूक संदर्भात आढवा बैठक घेतली. या बैठकीत पक्षनिरिक्षक‌ किशोर स्वामी, सुनील हाटकर, अब्दुल गफार उपस्थित होते. शहराध्यक्ष‌ राजू शेटे यांनी निवडणूक‌ तयारी बाबतीत माहिती देवून सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वार्डातील उमेदवार देणे, जून्या दिग्गजांना हाटवून तरुणांना संधी देणें, शहरातील स्वच्छता, प्रलंबित विकास कामे, शैक्षणिक समस्या, पाणी पुरवठा, आदी विषयांवर अडचणी, समस्या सांगितल्या, तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मांडू असे आश्वासन देऊन पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन किशोर स्वामी यांनी केले.

या वेळी मनसब खान पठाण, प्रवीण देशमुख, व्यंकटी राऊत, सोनाजी सरोदे, दिलीप डाढळे, व्यंकटी साखरे, पंडित शेटे, छत्रपती कानोडे, बबनराव लोखंडे, पिराजी साखरे, पंडित लंगडे, बालासाहेब शेटे, नागोराव साबळे, जुबेर काजी, शेख मकसूद, शेरु पठाण, अनिल मोरे, गूणवंत विरकर, नवनाथ बारसे, गोविंद साखरे, डॉ.शंकर कौठेकर, भारत कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या बैठकीच्या आधी विद्यामान नगरसेवकांच्या सुचना ऐकून घेतल्या. या वेळी नगरसेवक नासेर खान पठाण, मुसब्बीर खतीब, शेख लायक, डॉ. विशाल लंगडे, इम्रान सिद्दिकी, फेरोज कूरेशी, आख्तरुला बेग, मुख्तेदर खान पठाण, उमेश सरोदे, महंमद सूलतान, गाझी काजी आदी उपस्थित होते.

loading image
go to top