नांदेड : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधात्मक- डॉ. विपीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधात्मक- डॉ. विपीन

नांदेड : राष्‍ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा (NMMS)ही मंगळवार (ता. सहा) एप्रिल २०२१ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते दुपारी तीन या कालावधीत जिल्ह्यातील विविध ११ परिक्षा केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

जिल्ह्यातील गुजराथी हायस्‍कुल वजिराबाद नांदेड या केंद्रात परीक्षार्थी संख्‍या ३११, मानव्‍य विकास उच्च माध्यमीक विद्यालय देगलूर १२९, मिनाक्षी देशमुख उच्च माध्यमीक विद्यालय अर्धापूर १५४, महात्‍मा फुले विद्यालय बाबानगर, नांदेड २५७, हुतात्मा पानसरे हायस्‍कुल धर्माबाद २१४, महात्मा ज्‍योतीबा फुले हायस्‍कुल गोकूंदा किनवट २६९, श्री शिवाजी हायस्‍कुल कंधार २४३, जनता हायस्‍कुल नायगाव २७२, पंचशील विद्यार्जन उच्च माध्यमीक विद्यालय हदगाव २५३, शाहु महाराज विद्यालय भोकर २०५, महात्‍मा गांधी उच्‍च माध्यमीक विद्यालय मुदखेड १९९ अशी आहे.

हेही वाचावाई ग्रामपंचायतीने स्मशानभूमी सुविधा कामासाठी केले दोन लक्ष रुपये खर्च

या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच ही परीक्षा ही स्वच्छ व सुसंगत पार पाडण्याच्या दृष्टीने आणि सर्व संबंधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्य परिस्थीतीत शक्य नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे  कलम १४४ अन्वये, या परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या परिसरात मंगळवार ता. सहा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचवाजेपर्यतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी- कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच वर दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील १०० मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. 

Web Title: Nanded National Economically Weak Component Scholarship Examination Center Campus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..