esakal | नांदेड : तीन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, शुक्रवारी ६८ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नांदेडला शुक्रवारीही रुग्ण दगावला नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.  

नांदेड : तीन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, शुक्रवारी ६८ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  जिल्ह्यात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता. २७) एक हजार ६३० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारीही रुग्ण दगावला नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळवले आहे.   

आरोग्य विभागाने गुरुवारी (ता. २६) शेकडो संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीकरता प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्या स्वॅब अहवालांपैकी गुरुवारी एक हजार ६३० अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यात नांदेड महापालिका क्षेत्रातील - ४२, कंधार - पाच, देगलूर - एक,  अर्धापूर - एक, लोहा - दोन, हदगाव - एक, किनवट - एक, जळगाव-एक, पटना बिहार - आठ, दिल्ली - दोन, ग्वाल्हेर मध्यप्रदेश- एक, हिंगोली - दोन, परभणी - एक असे ६८ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार २६४ इतकी झाली आहे. 

हेही वाचा - देगलूर येथे बारा तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्यापैकी - सात, मनपाअंतर्गत एनआरआय भवन आणि गृह विलगीकरण कक्षातील - ३७, मुखेड - एक, खासगी रुग्णालय - ११, देगलूर - तीन असे ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९ हजार १०९ इतकी असून, शुक्रवारी दिवसभरात बाधित रुग्णांपैकी एकचाही मृत्यू झाला नसल्याने आरोग्य विभागास दिलासा मिळाला आहे. जिल्हातील मृत्यूचा आकडा तीन दिवसांपासून ५४७ वर स्थिर आहे. 

हे देखील वाचाच - नांदेड : मनपा पशुवैद्यकीय रुग्णालयात यंत्रांचा अभाव

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १७० व जिल्हा शासकीय रुग्णालयात - ६५ अशा मिळुन २३५ खाटा रिक्त आहेत. जिल्हाभरातील विविध शासकीय व निमशासकीय रुग्णालय व गृहविलगीकरण कक्षात ४१६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १५ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. ६११ स्वॅप तपासणी प्रलंबितच आहे.   
 
कोरोना मीटर 

  • शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ६८ 
  • शुक्रवारी कोरोनामुक्त - ५९
  • शुक्रवारी मृत्यू - शुन्य 
  • एकुण पॉझिटिव्ह - २० हजार २६४ 
  • एकुण कोरोनामुक्त - १९ हजार १०९ 
  • एकुण मृत्यू - ५४७ 
  • उपचार सुरु - ४०७४१६ 
  • स्वॅब अहवाल प्रतिक्षेत - ६११
  • गंभीर असलेले रुग्ण - १५
loading image